सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य - केंद्र सरकार
* घरगुती गॅसची सबसिडी, मनरेगा, पेन्शन इत्यादींसह केंद्र आणि राज्य सरकारच्या तमाम योजनांचे लाभ व सवलती मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा अधिकार केंद्र सरकारने घेतला आहे.
* घरगुती गॅसशी संबंधित पेट्रोलियम मंत्रालय असो की सरकारी शिष्यवृत्ती संबंधित मनुष्यबळ विकास मंत्रालय, आधार कार्ड नसलेला एकही लाभार्थी योजनेच्या अमंलबजावणीतून सुटू नये, यासाठी युनिक आयडेंटीटी अधिनियमावर नोंदणी रजिस्ट्राशी संलग्न यंत्रणा प्रस्थापित करून त्याची रीतसर नोंदणी करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालयावर सोपवण्यात आली आहे.
* तसेच त्याखेरीज आधार कार्ड कोणत्या सरकारी योजनांसाठी अनिवार्य आहे, त्याची यादीही संबंधित मंत्रालयातर्फे वेळोवेळी अधिसूचित केली जाईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा