
* भारताची सरकारी तेल उत्पादक व विपणन कंपनी इंडियन ऑइल या कंपनीचे उत्पन्न पाकिस्तानच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे.
* २०१५ मध्ये इंडियन ऑइल या कंपनीचे उत्पन्न ५४.७ एवढे होते तर पाकिस्ताचे महसुली उत्पन्न ३८.७ अब्ज डॉलर एवढे होते.
* ब्रिटनची संस्था ग्लोबल जस्टीस नाउ ने नुकत्याच केलेल्या एका सर्वेनुसार जगातील १० मोठ्या कोर्पोरेशन यांची कमाई अनेक देशांच्या संयुक्त कमाईपेक्षा जास्त आहे.
* वलमार्ट, ऍपल, शेल या तिन्ही कंपन्यांचा एकूण महसूल १८० गरीब देशांच्या एकूण उत्पन्न यांच्या पेक्षा जास्त आहे.
* संस्थेचे अध्यक्ष यांच्या मते मोठ्या कोर्पोरेशन कडे गडगंज संपत्ती आणि ताकद असणं हे जगातील अनेक समस्यांचं कारण आहे.
* स्वतःच्या फायद्यासाठी या कंपन्या मूलभूत मानवी हक्क दडपतात. अशा मोठ्या कोर्पोरेशनची मदत करू नये यासाठी ही संस्था ब्रिटनवर दबाव आणत आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा