कोकण -
सह्याद्री पर्वत अरबी समुद्राच्या दरम्यान पसरलेल्या अरुंद किनारपट्टीचे कोकण आहे. कोकणात एकूण ६ जिल्हे आहेत.
देश -
सह्यांद्रीच्या पूर्व बाजूला महाराष्ट्राचा देश हा प्रादेशिक विभाग आहे. यामध्ये एकूण ७ जिल्हे आहेत.
घाटमाथा -
सह्यांद्रीच्या पर्वताच्या उंचवट्याचा भाग घाटमाथा म्हणून ओळखला जातो.
मावळ -
सह्याद्रीचा पूर्वेकडील उतरणीचा भाग मावळ प्रांत म्हणून ओळखला जतो.
खान्देश-
उत्तर महाराष्ट्रातील खोऱ्यातील धुळे नंदुरबार जळगाव या भागांना खान्देश असे म्हणतात. जमीन काळी असून कापूस व केळी हे पिके प्रसिद्ध आहेत.
मराठवाडा -
मराठवाडा महाराष्ट्रातील गोदावरीच्या खोऱ्यास मराठवाडा असे म्हणतात. मराठवाड्यात एकूण ८ जिल्हे आहेत.
विदर्भ -
पूर्णा,वर्धा,पेनगंगा,वेनगंगा या नद्यांच्या खोऱ्याच्या प्रदेशास विदर्भ व वऱ्हाड असे म्हणतात. थेतील जमीन सुपीक व काळी कसदार असून कापूस, संत्रा, इ पिके येतात.
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग जिल्ह्यांची संख्या -
कोकण विभाग-६, नाशिक विभाग-५,पुणे विभाग-५, औरंगाबाद विभाग-८, नागपूर विभाग -६,अमरावती विभाग-५,
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग-
कोकण विभाग- ६, देश विभाग-७, खानदेश विभाग-३, मराठवाडा विभाग-८, वऱ्हाड विभाग-११,
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा