* शेती व उद्योग यांना एकत्रितरीत्या प्राधान्य देणारी तुलनेने मोठ्या आकाराची म्हणून तिसऱ्या योजनेकडे पहिले जाते.
* या योजनेचे १९६४ पर्यंत पंडित नेहरू हे या योजनेचे अध्यक्ष होते. उरलेल्या काळात लालबहादूर शास्त्री हे अध्यक्ष होते. हि योजनाही पी सी महालनोबीस यांच्या प्रतीमानावर आधारित होती.
* राष्ट्रीय उत्पन्नात प्रती वर्षी ५.६% दराने वाढ, अन्नधान्य उत्पादन कमी असल्याने अन्नधान्य उत्पन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे, पोलाद,रसायने,यंत्रसामुग्री, पायाभूत स्वरूपाचे उद्योगधंदे वाढविणे, देशातील श्रमशक्तीचा जास्तीत जास्त वापर करणे, अधिक रोजगाराच्या संधी, विकास असमतोल व संपत्ती वाटपातील विषमता कमी करणे, ही
या योजनेची उद्दिष्टे होती.
* या योजनेत सार्वजनिक प्रस्तावित खर्च ७,५०० कोटी रुपये प्रत्यक्षात या योजनाकाळात ८,५७७ कोटी रुपये
सार्वजनिक क्षेत्रात खर्च केले. औद्योगिक क्षेत्रात २०.१%, वाहतूक व दळणवळण क्षेत्रात २४.६%, उर्जासाधानावर
१४.६%, जलसिंचन प्रकल्पावर ७.८%,इत्यादी रक्कम खर्च झाली.
* या पार्श्वभूमीवर हि योजना यशस्वी होऊ शकली नाही. राष्ट्रीय उत्पन्नात ५.६% दराने उद्दिष्ट असताना २.७%
इतपत वाढ साध्य झाली.
* या सर्व पातळ्यावर ही योजना अयशस्वी ठरली. या योजनेची चुकीची उद्दिष्टे, व चुकीची धोरणे, व राजकीय आर्थिक
परिस्थिती यामुळेच हि योजना अयशस्वी ठरली.
* या योजना काळात १९६६ मध्ये रुपयाचे अवमूल्यन करावे लागले. त्यामुळे निर्यातीस चालना मिळावी असा यामागे
हेतू होता.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा