STI विक्रीकर निरीक्षक परीक्षा योजना व अभ्यासक्रम STI [पूर्व परीक्षा] तपशील
* सामान्य क्षमता चाचणी परीक्षा पेपर १ असा पूर्व परीक्षेसाठी पेपर असतो.
* एकूण प्रश्नसंख्या १०० व प्रत्येकी १ असे १०० गुण असतात.
* प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवी असून माध्यम मराठी व इंग्रजी असते.
* परीक्षेचा कालावधी एक तास असून प्रश्नाचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.
अभ्यासक्रम - सामान्य क्षमता चाचणीत खालील विषयामध्ये खालील घटकाचा समावेश असेल.
* चालू घडामोडी - जागतिक व भारतातील सर्व
* नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन.
* आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
* भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे
* अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, परीक्षण
* सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, व वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
* बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
विक्रीकर निरीक्षक, गट ब [ अराजपत्रीत ] - मुख्य परीक्षा
परीक्षा योजना
* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहूपर्यायी
* एकूण गुण - २०० गुण
* प्रश्नपत्रिकांची संख्या - दोन
* पेपर १ - मराठी व इंग्रजी [ मराठी ६० गुण व इंग्रजी ४० गुण ], दर्जा मराठी बारावी, इंग्रजी - पदवी, माध्यम इंग्रजी - मराठी, एक तास
* पेपर २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान, एकूण गुण १००, प्रश्नसंख्या १००, दर्जा पदवी, माध्यम मराठी, कालावधी १ तास
अभ्यासक्रम - पेपर १ - मराठी व इंग्रजी
* मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
* इंग्रजी - Common Vocabulary, Sentensce Structure, Grammar, use of idoms and phreses and their meaning and comprehension of passage.
अभ्यासक्रम - पेपर क्र २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
* चालू घडामोडी - भारत व जग
* बुद्धिमापन व बुद्धिमत्ता सर्व
* महाराष्ट्राचा भूगोल - महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल व त्याचे विभाग, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती - वने व खजिने, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या व त्याचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
* महाराष्ट्राचा इतिहास - सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, व राष्ट्रीय चळवळी.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा