आजपासून पनवेल राज्यातील २७ वी महानगरपालिका सुरु - २०१६* देशातील पहिली नगरपालिका म्हणून ओळख असलेले पनवेल शहर १ ऑकटोम्बर २०१६ पासून महापालिका म्हणून ओळखले जाणार आहे.
* नगरपालिका आणि शेजारील २९ गावे मिळून पनवेल राज्यातील २७ वी रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
* पनवेल नगरपालिकेची स्थापना २५ ऑगस्ट १८५२ मध्ये झाली तेव्हा देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
* शासनाने ९ डिसेंबर २०१५ ला कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने ६ मे २०१६ रोजी अहवाल दिला आणि १ ऑकटोम्बर २०१६ ला महापालिका अस्तित्वात आली.
* नवीन महापालिकेमध्ये नागपालिका, तळोजा MIDC परिसर, आणि पनवेल तालुक्यातील २९ महसुली गावांचा समावेश करण्यात येईल.
* ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा समावेश असणार असून २०११ च्या जणगणेनुसार ५ लाख लोकसंख्या असणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा