
* जागतिक बँकेने काल ' दक्षिण आशियाई आर्थिक विकास फोकस ' हा अहवाल सादर केला. हा अहवाल आगामी दोन वर्षासाठी असेल.
[ अहवालातील ठळक मुद्दे ]
* दक्षिण आशिया हे जागतिक पातळीवर आर्थिक वृद्धीचे केंद्र असून, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा [जिडीपी] वृद्धी दर २०१६ मध्ये ७.६, २०१७ मध्ये ७.७ एवढा राहील. असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
* अहवालानुसार कृषी क्षेत्रातील तेजीची अपेक्षा, सातव्या वेतनआयोग वाढीमुळे मागणीत होऊ शकणारी वाढ, निर्यातीमुळे मिळणारे सकारात्मक योगदान, वैयक्तिक गुंतवणुकीतील सुधारणा यामुळे जिडीपी दर वाढेल.
* भारतासमोर वृद्धीबरोबरच गरिबी कमी करणे, समावेशक विकासाला प्रोत्साहन देणे, आरोग्य, पोषण, शिक्षण, आणि महिला व पुरुषातील, असमानता, दूर करणे यासारखी आव्हाने आहेत.
* दक्षिण आशिया हे जागतिक पातळीवर आर्थिक वृद्धीचे केंद्र असून, चीनमध्ये सध्या मंदी आहे, विकसित देशात धोरणात अनिश्चित्ता आहे. निधी प्रेषणाची गती धीमी झाली आहे.
* अशा परिस्थितीत दक्षिण आशियाई आपला वृद्धिदर कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. पाकिस्तान बाबत अहवालात देशाचा वृद्धिदर अनुक्रमे ५.०, ५.४ राहील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा