टूजी घोटाळ्यात ए राजा, कनिमोळी यांची दोषमुक्तता - २१ डिसेंबर २०१७
* टू जी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके, नेत्या आणि खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपीना न्यायालयाने दोषमुक्त केले.
* काँग्रेसप्रणित युपीए२ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्टरम घोटाळा उघड झाला होता. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. असा निष्कर्ष कॅग च्या अहवालात काढण्यात आला.
* स्पेक्ट्रम वाटपासंबंधीच्या ७ जानेवारी २००८ च्या प्रसिद्धी अधिसूचनेत ए राजा यांनी फेरफार केल्याचा ठपका संयुक्त संसदीय समितीच्या अहवालात ठेवण्यात आला होता.
* २०११ मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते.
* गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित केले होते.
* गुरुवारी सकाळी न्यायालयाने याप्रकरणात निकाल दिला आहे. या आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने सर्व १७ आरोपीना दोषींमुक्त ठरविण्यात आले आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा