२०२३ सालच्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे - १२ डिसेंबर २०१७
* २०१९ विश्वचषकाआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. २०२१ साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले.
* २०१९ सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहेत. यानंतर २०२३ साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे.
* याआधी भारतात १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये भारतात वनडे विश्वचषकाच आयोजन करण्यात आलं होत. २०११ साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता.
* २०११ चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता. हा विश्वचषक पटकावून टिम इंडियानं सचिनला खास भेट दिली होती.
* दरम्यान २०१५ साली ऑस्ट्रेलिया न्यूझीलँडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचं आव्हाहन उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होत.
* २०२३ च्या विश्वचषकाशिवाय २०२१ सालच्या प्रस्तावित चॅम्पियन्स ट्रॉफीच आयोजनही भारतातच करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी असणार आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा