गती ( Motion )
गतीचे प्रकार -
स्थानातरीय गती - जर वस्तूची स्थानातरनीय गती एका सरळ रेषेत असेल तर त्या गतीला रेषीय गती असे म्हणतात.
उदा - चालणारा माणूस.
घ्रूणन गती - या गतीमध्ये वास्तुमधील वेगवेगळे कण एकाच आसाभोवती वर्तुळाकार मार्गाने असतात.
फिरणारा पंखा,
दोलन गती - दोलन गतीमध्ये पदार्थात एकाच प्रकारची हालचाल पुन्हा पुन्हा एकाच मार्गाने होते.
उदा - शिवनयंत्राची सुई.
अंतर - जेव्हा एखादी वस्तू एखाद्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाते. तेव्हा त्या दोन ठिकाणा मधील लांबीला अंतर अस म्हणतात.
विस्थापन - तर त्या दोन ठिकाणामधील विशिष्ट दिशेने चाललेल्या एकरेषीय लांबीला विस्थापन असे म्हणतात.
* अंतर हि आदिश राशी आहे .
* विस्थापन हि सदिश राशी आहे.
* मुलभूत राशी - CGS पद्धती सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, MKS पध्दतीत मीटर, किलोग्रॅम, सेकंद.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा