महाराष्ट्रात GST दोन्ही सभागृहात मंजूर - २०१६* महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात वस्तू व सेवा कर विधेयक [ GST ] मंजूर करण्यात आले.
* विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या विधेयकास पाठिंबा दिला आहे.
* अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की जिएसटी साठी राज्याचा कायदा असेल आणि तो येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येईल.
* वस्तू व सेवा कर घटना दुरुस्ती विधेयकाला देशातील २९ राज्यांपैकी किमान १५ राज्याची मंजुरी आवश्यक आहे.
* महाराष्ट्र हे विधेयकाला मंजुरी देणारे दहावे राज्य ठरले आहे. आतापर्यंत आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झाडखंड, नागालँड, छत्तीसगढ या राज्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
* त्यामुळे आता हे विधेयक लवकरात लागू होण्यासाठी अजून किमान सहा राज्याची मंजुरीची आवश्यकता असून ती मिळेल अशी सरकारला आशा आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा