MPSC Assistance सहाय्यक पूर्व परीक्षा - योजना व अभ्यासक्रम परीक्षा योजना
* या पदासाठी सामान्य क्षमता या विषयाची एक प्रश्नपत्रिका असते.
* हि प्रश्नपत्रिका १०० प्रश्नांची व १०० गुणांची असते.
* परीक्षेचा दर्जा हा पदवी वर अवलंबून असतो.
* प्रश्नपत्रिकेचे माध्यम - मराठी व इंग्रजी असते.
* परीक्षेचा कालावधी - एक तास असतो.
* परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते.
अभ्यासक्रम - सामान्य क्षमता चाचणीत खालील विषयामध्ये खालील घटकाचा समावेश असेल.
* चालू घडामोडी - जागतिक व भारतातील सर्व
* नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व प्रशासन, ग्राम व्यवस्थापन प्रशासन.
* आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
* भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे
* अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी, शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, परीक्षण
* सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, व वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
* बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.
सहाय्यक गट ब अराजपत्रीत [ मुख्य परीक्षा अभ्यासक्रम ]
परीक्षा योजना
* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहूपर्यायी
* एकूण गुण - २०० गुण
* प्रश्नपत्रिकांची संख्या - दोन
* पेपर १ - मराठी व इंग्रजी [ मराठी ६० गुण व इंग्रजी ४० गुण ], दर्जा मराठी बारावी, इंग्रजी - पदवी, माध्यम इंग्रजी - मराठी, एक तास
* पेपर २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमापन विषयाचे ज्ञान, एकूण गुण १००, प्रश्नसंख्या १००, दर्जा पदवी, माध्यम मराठी, कालावधी १ तास
अभ्यासक्रम - पेपर १ - मराठी व इंग्रजी
* मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
* इंग्रजी - Common Vocabulary, Sentensce Structure, Grammar, use of idoms and phreses and their meaning and comprehension of passage.
अभ्यासक्रम - पेपर क्र २ - सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता
* चालू घडामोडी - भारत व जग
* बुद्धिमापन व बुद्धिमत्ता सर्व
* महाराष्ट्राचा भूगोल - महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल व त्याचे विभाग, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती - वने व खजिने, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या व त्याचे परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.
* महाराष्ट्राचा इतिहास - सामाजिक व आर्थिक जागृती, महत्वाच्या व्यक्तीचे काम, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमान पत्रे व शिक्षणाचा परिणाम भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी, व राष्ट्रीय चळवळी.
* भारतीय राज्यघटना - घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये,राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, व मंत्रिमंडळ, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ - विधानसभा विधानपरिषद व त्याचे सदस्य अधिकार, कार्य व रोल, विधी समित्या.
* माहिती अधिकार अधिनियम - २००५
* संगणक व माहिती तंत्रज्ञान - आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनाचा संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व संबंधित कायदे व केस स्टडीज, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानांचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब आशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी.
* राजकीय यंत्रणा [ शासनाची रचना अधिकार व कार्ये ] केंद्र सरकार केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्यसरकार व प्रशासन [ महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात
* जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन.
* न्यायमंडळ - न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार, दुय्यम न्यायालये लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, संविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडल रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा