भारत भौगोलिक व सामान्य माहिती

भारताचा विस्तार
आपला भारत ८'४' उत्तर अक्षांश व ३७'६'उत्तर अक्षांश ६८'७' पूर्व रेखांश व ९७'२५' पूर्व रेखांश या दरम्यान पसरलेला आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेले आहे. भारताची दक्षिणोत्तर लांबी ३,२१४ कि मी असून पूर्व पश्चिम रुंदी २,९३३ कि मी आहे.

भारताचे क्षेत्रफळ
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ कि मी असून क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. आणि लोकसंखेच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो.

समुद्रकिनारा
भारतास सुमारे ७,५१७ कि मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. यामध्ये भारताची मुख्य भूमी आणि अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांच्या किनारपट्टीचा समावेश आहे. फक्त भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची एकूण लांबी ६१०० कि मी आहे.

सरहद्दीवरील देश
भारताच्या सीमेवर चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, अशी एकूण सात राष्ट्रे आहेत. भारताच्या भू सरहद्दीची एकूण लांबी १५,२०० कि मी इतकी आहे. पाल्कची सामुद्रधुनी व मानारचे आखात यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळे झाले आहे.भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताच्या रांगा, दक्षिणेस हिंदी महासागर, पश्चिमेस अरबी समुद्र, आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे. ग्रेट निकोबार बेटावरील इंदिरा गांधी पॉईट या भारताच्या अतिदाक्षिनेकडील टोकावर आहे.

2 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.