बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ते-रेल्वे पुलाचे लोकार्पण - २७ डिसेंबर २०१८

देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ते-रेल्वे पुलाचे लोकार्पण - २७ डिसेंबर २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील सर्वाधिक लांबीच्या रस्ते-रेल्वे पुलाचे लोकार्पण केले. आसाम राज्यातील ढेमजी आणि दिब्रुगढ जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याना जोडणाऱ्या या बोगीबिल पुलामुळे स्थानिकांची मोठी सोया झाली आहे. शिवाय सैन्य दलांना चीन सीमेवर पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

* मोदींनी पुलाचे लोकार्पण केल्यानंतर त्याच्या रेल्वे मार्गावरून तिनसुखिया-नेहरलगून इंटरसिटी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

[बोगीबील पुलाचे वैशिष्ट्ये]

* नागरी दळणवळणासह चीन सीमेवर लष्करी जवान, रसद पोहोचण्यासाठी उपयुक्त, पुलावरील रस्त्याच्या युद्धप्रसंगी लढाऊ विमानासाठी धावपट्टी म्हणून  वापर करता येणार, रणगाडेही नेता येणार.

* सिमेंटच्या ३० लाख गोण्या ३५४०० मेट्रिक टन पोलाद लागले. ब्रम्हपुत्रेचा पूर, ७ रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झेलण्याची क्षमता.

* १२० वर्षाचे आयुष्य देवेगौडानी १९९७ मध्ये केले भूमिपूजन, अटलबिहारी वाजपेयींच्या कारकिर्दीत २००२ मध्ये कामाला सुरुवात.

* बांधकामाची किंमत ३ हजार २३० कोटीवरून ५ हजार ९६० कोटी रुपयांपर्यंत चाढली. 

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

काट्रियोना ग्रे २०१८ ची मिस युनिव्हर्स - १८ डिसेंबर २०१८

काट्रियोना ग्रे २०१८ ची मिस युनिव्हर्स - १८ डिसेंबर २०१८

* थायलंडमधील बॅंकॉंक शहरात पार पडलेल्या ६७ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत फिलिपिन्सची काट्रियोना ग्रेन २०१८ चा मिस युनिव्हर्स किताब पटकावला जवळपास ९३ देशातील सौन्दर्यवतींची या स्पर्धेत भाग घेतला होता.

* मिस युनिव्हर्स चा किताब पटकावणारी ती चौथी फिलिपिन्स सौन्दर्यवती ठरली आहे. काट्रियोना २४ वर्षाची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक गायिका म्हणूनही प्रसिद्ध आहे.

* या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पेनच्या अँजेलिना पोन्स या ट्रान्सजेंडर सौन्दर्यवतीने सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व नेहल चुदासमा हिने केले होते.

* फर्स्ट रनर अप टेमरीन ग्रीन दक्षिण आफ्रिका, सेकंड रनर अप स्टेफनी गुटरेज वेनेजुएला, मिस युनिव्हर्स भारत १९९४ सुश्मिता सेन, २००० लारा दत्ता.

* मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन मिस युनिव्हर्सया संघटनेद्वारे केले जाते. बोधचिन्ह वूमन विद स्टार्स, घोषवाक्य confidently Beautiful पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा १९५२ मध्ये पार पडली.  

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

पी. व्ही. सिंधू सलग ७ वेळा वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी पहिली भारतीय महिला - १७ डिसेंबर २०१८

पी. व्ही. सिंधू सलग ७ वेळा वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी पहिली भारतीय महिला - १७ डिसेंबर २०१८

* भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी २०१७ च्या विश्व चॅम्पियन नोजोमी ओकुहरा हीला पराभूत करत वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेतेपद पटकावले.

* सलग सात अंतिम सामन्यात पराभव पत्करल्यावर सिंधूने हा विजय मिळवला आहे हे विशेष. त्यासोबतच ती वर्ल्ड टूर फायनल्स जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली.

* पी. व्ही. सिंधूने आतापर्यंत जिंकलेल्या स्पर्धा - २०११ इंडोनेशिया इंटरनॅशनल, २०१३ मलेशिया मास्टर्स, २०१३ मकाऊ ओपन, २०१४ मकाऊ ओपन, २०१५ मकाऊ ओपन, २०१६ मलेशिया मास्टर्स चायना ओपन, २०१७ सय्यद मोदी इंटरनॅशनल, इंडिया ओपन, कोरिया ओपन, २०१८ वर्ल्ड टूर फायनल.

* यावेळीच्या सामन्यात १ तास आणि दोन मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने २१-१९, २१-१७ असा पराभव करत विजय मिळवला.

* सिंधूचे हे कारकिर्दीतील ११ वे विजेतेपद आहे. मात्र या वर्षातील तीचे हे पहिले विजेतेपद आहे. तिच्या मते आता आमच्यासाठी २०२० आणि २०२२ हे वर्ष खूपच महत्वाचे आहे.

* यावेळी ऑलिम्पिक, राष्ट्रकूल स्पर्धा व आशियाई स्पर्धा होतील. पुढील वर्षी ऑल इंडिया चॅम्पियनशिप जिंकणे हेच आमचे मुख्य लक्ष आहे.


शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

अमिताव घोष यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर - १५ डिसेंबर २०१८

अमिताव घोष यांना यावर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर - १५ डिसेंबर २०१८

* सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली.

* या बैठकीत ५४ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी घोष यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. इंग्रजी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये घोष यांची गणना होते.

* घोष यांच्या शॅडो लाईन्स या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना २००७ साली पदमश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.

* घोष यांची गाजलेली पुस्तके - दी सर्कल ऑफ रिजन १९८६, शॅडो लाईन्स १९८८, कलकत्ता क्रोमसम १९९५, आणि सी ऑफ पॉपीज २००८ ही पुस्तके आहेत.

* ११ जुलै १९५६ मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या घोष यांचे महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. दिल्ली विश्वविद्यालयाचे सेंट स्टीफन कॉलेज आणि दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतल्यानंतर द सर्कल ऑफ रिजन ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. 

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

MPSC नवीन चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१८

MPSC नवीन चालू घडामोडी - १२ डिसेंबर २०१८

* भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात २०२२ मध्ये जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जी २० परिषदेच्या समारोपाची प्रसंगी दिली.

* चंद्रावर मानवी तळ उभारण्याच्या नासा च्या घोषणेनंतर रशियानेही लगेचच चंद्रावर थेट मानवी वसाहत उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अंतराळ क्षेत्रात या दोन महाशक्तीसोबत जगातील इतर देशांमध्येही मोठी स्पर्धा भविष्यात बघायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

* इंटेग्रल कोच फॅक्टरी ने आयएफसी उत्पादित केलेल्या ट्रेन १८ या भारतातील पहिल्या विनाइंजिनच्या रेल्वेगाडीने ताशी १८० किमीहून अधिक वेगाने धावण्याची चाचणी पूर्ण केली आहे.

* जागतिक मराठी अकादमीच्या वतीने १६ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ४, ५ व ६ जानेवारी रोजी नागपूर येथे होऊ घातले आहे. या तीन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी अमेरिकेचे रहिवासी असलेले उद्योजक डॉ श्रीनिवास ठाणेदार यांची निवड करण्यात आली.

* सुप्रसिद्ध मराठी काव्य समीक्षक प्रा मधुकर पाटील यांच्यासह २४ लेखकांना यंदाच्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

* सर्वाधिक कार्बन डायऑकसाईड उत्सर्जित करणाऱ्या देशात भारताचा चौथा क्रमांक लागला आहे. जगात उत्सर्जित होणाऱ्या एकूण कार्बन डायऑकसाईडपैकी ७ टक्के भारत उत्सर्जित करतो.

* बहुप्रतीक्षित कृषी निर्यात धोरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सेंद्रिय आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांच्या निर्यातीवरील सर्व बंधने हटविणे आणि राज्यामध्ये निर्यातीसाठी क्लस्टर विकसित करणे हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे.

* केंद्र सरकारने कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी असेल.

* जर्मनीच्या चॅन्सलर आणि सत्ताधारी ख्रिश्चन डेमोक्रेटिक पक्षाच्या सीडीयू अध्यक्षा अँजेला मर्केल यांनी आज आधीच घोषित केल्याप्रमाणे पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्या तब्बल १८ वर्षे पदावर होत्या.

* जागतिक स्तरावर मार्केट रिसर्च क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या फ्रॉस्ट अँड सॉलीव्हीन कंपनीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'इंडिया मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स अवॉर्ड' हा औद्योगिक निर्मितीत सर्वोत्तम ठरण्यासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्याला जाहीर झाला आहे.

* चंद्राची अंधारी बाजू उजेडात आणण्याची एक ऐतिहासिक मोहीम चीनने हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत चांग-४ नामक अंतराळ यान पृथ्वीच्या या उपग्रहाच्या नेहमी काळोखात राहणाऱ्या प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी आज झेपावणार आहे.

* आण्विक शस्त्रे घेऊन जाण्यात सक्षम असलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची अग्नी ५ ची भारताने सोमवारी ओडिशात यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ५ हजार किमीपर्यंतचे लक्ष्य भेदण्यास सक्षम आहेत.

* राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी केंद्रीय राज्य मंत्रिपदाचा आज राजीनामा दिला. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

* देशातील महत्वाच्या ५ राज्यातील निवडणुकांचे निकाल लागले असून मध्यप्रदेशात एकूण २३० जागेपैकी  भाजपाला १०९, काँग्रेस ११४, बसपा २, अपक्ष ४ जागा मिळाल्या. राजस्थानात एकूण १९९ जागेपैकी भाजप ७३, काँग्रेस ९९, बसपा ६, अपक्ष १३ जागा मिळाल्या. छत्तीसगढमध्ये एकूण  ९० जागेपैकी भाजप १५, काँग्रेस ६८, बसपा २, काँग्रेस ५ एवढ्या जागा होत्या. मिझोराममध्ये एकूण जागा ४० असून त्यापैकी एमएनएफ २६, अपक्ष ८, काँग्रेस ५. तेलंगणा ११९ जागेपैकी टीआरएस ८८ जागा, काँग्रेस १९ जागा, एमआयएम ७, टीडीपी २ जागा.

* भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या डॉ उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात केंद्र सरकारने त्या पदावर शक्तीकांत दास यांची नियुक्ती केली आहे.

* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या बांधकामास गती देण्याबरोबरच निश्चित मुदतीत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्द व्हावीत यासाठी स्वत्रंत महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ महाहाऊसिंग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री असणार आहे.

* भारतीय नौदलामध्ये प्रथमच दुर्घटनेदरम्यान पाणबुड्याना खोल समुद्रातून सुरक्षितपणे बाहेर काढणारी मदत आणि बचाव प्रणाली भारताचे नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या हस्ते मुंबईत नौदल गोदीत समाविष्ट करण्यात आली.

* तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

* केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशाच्या उद्योग क्षेत्राच्या स्थितीचे निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन दर ऑकटोबरमध्ये ८.१ टक्के राहिला.

* अलीकडेच फ्रान्समध्ये सुरु असलेले यलो वेस्ट आंदोलन खूप चर्चेत आहे. या आंदोलनाची सुरुवात मे २०१८ मध्ये झाली. यानंतर १७ नोव्हेंबरपासून फ्रान्समध्ये प्रदर्शने सुरु झाले.

* भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक राजीव संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या लेखापरीक्षक पॅनेलच्या न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या वार्षिक बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली.

* हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडने ने ६ किलोमीटर उंचीवर उडणारे कमी वजनाचे लाईट युटिलिटी हेलीकॉप्टर विकसित केले आहे.

* टाइम मासिकाने सौदी अरेबियाने पत्रकार जमाल खशोगीसह इतर पत्रकारांना [टाइम पर्सन ऑफ द इयर] जाहीर केले.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार मंडळातील सदस्य असलेले सुरजीत भल्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

* शाश्वत जल व्यवस्थापनावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद मोहाली पंजाब येथील इंडियन स्कुल ऑफ बिझिनेस आयएसबी मध्ये आयोजित केली गेली.

* युरोपियन युनियनने इयू भारतातील पहिले जीन मोनेट सेंटर फॉर एक्सलन्स उत्कृष्टता केंद्र नवी दिल्ली येथे सुरु केले.

* केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग इन्शुअर हे पोर्टल सुरु केले. थेट लाभ हस्तांतराच्या डीबीटी लाभार्थ्यांना थेट डीबीटीशी जोडण्यासाठी हे पोर्टल लॉन्च केले गेले.

* मिझोराममध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंट एमएनएफ या प्रादेशिक पक्षाने बहुमत मिळविल्यामुळे येथे १० वर्षांनी सत्ताबदल झाला.

* आशियाई विकास बँकेच्या आऊटलूक सप्लिमेंटने चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

* भारत आणि चीन दरम्यान १० डिसेंबर रोजी सातव्या हँड इन हँड या संयुक्त युद्ध अभ्यासाला सुरुवात झाली. भारत आणि चीनमध्ये झालेल्या डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी हा युद्ध सराव रद्द करण्यात आला होता.

* भारताचा शुभंकर शर्मा आशियाई टूर ऑर्डर ऑफ मेरिट जिंकणारा पाचवा आणि सर्वात युवा भारतीय ठरला आहे.

* आयआयटी सुरक्षा शिक्षणासाठी आयआयटी खरगपूरने डीएसीआयचा उत्कृष्टता पुरस्कार २०१८ एक्सिलन्स अवॉर्ड जिंकला.

* तामिळनाडू पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आशियाई विकास बँकेसह ३१ दशलक्ष डॉलर्सच्या ऋण करारावर स्वाक्षरी केली.

* केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला देण्यात आले आहे.

* जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच जाहीर केलेल्या जागतिक पोषण अहवाल २०१८ नुसार ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट भारतात जगातील सर्वाधिक खुंटीत वाढ असलेली बालके आहेत.

* पश्चिम सियांग जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आलेला शी योमी या अरुणाचल प्रदेशमधील २३ वा जिल्हा बनला आहे.

* अणवस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची १० डिसेंबर रोजी ओडिशातील डॉ  अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी करण्यात आली.

* स्वतंत्र विकास संस्था जर्मनवॉचने हवामानविषयक जोखीम निर्देशांक २०१९ ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स २०१९ प्रसिद्ध केला आहे.

* भारतीय तटरक्षक बलाने पोर्ट ब्लेअरमध्ये क्लीन सी २०१८ या अभ्यासाने आयोजन केले. सागरातील तेल गळतीच्या घटना रोखण्याचा सराव करणे हा या अभ्यासाचा हेतू होता.

* ग्लोबल कार्बन प्रोजेक्टद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार भारत जगातील चौथा सर्वात मोठा कार्बन डायऑकसाइड उत्पादक देश आहे.

* देशभरात २०२३ सालापर्यंत सुमारे ५ हजार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प सीबीजी उभारण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेश प्रधान यांनी रविवारी दिली आहे.

* महत्वाकांक्षी उज्वला योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून देशभरातील सर्व गरिबांना मोफत गॅस जोडणी मिळणार आहे.

* पुणे-नाशिक हायस्पीड लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून प्रकल्पाचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी एकूण ७५०० कोटी खर्च लागणार असून राज्य, केंद्र, गुंतवणूक संस्था कडून लावण्यात येणार आहे. या रेल्वेचा स्पीड २२० प्रतितास राहणार आहे.

* योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग्य इन्स्टिट्यूट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डॉ गीता अय्यंगार यांचे निधन झाले.

* मिझो नॅशनल फ्रंटचे एमएनएफ चे अध्यक्ष झोरमथंगा यांनी शनिवारी मिझोरामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ईशान्येकडील राज्याचे ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. याआधी झोरथंगा सन १९९८ व २००३ मध्ये मुख्यमंत्री झाले होते.

* भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमधील बडोदा येथे साकारत असून रेल्वेमंत्री पियुष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या हस्ते त्यांचे शनिवारी लोकार्पण होणार आहे. रशिया, चीननंतर भारतातील हे तिसरे अशाप्रकाचे विद्यापीठ आहे.

* भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या एफटीआयआय अध्यक्षपदाची सूत्रे विद्यमान उपाध्यक्ष, दिग्दर्शक आणि निर्माते ब्रिजेंद्र पाल सिंग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या बांधकामास गती देण्याबरोबर निश्चित मुदतीत नागरिकांचा परवडणारी घरे उपलब्द व्हावीत यासाठी स्वतंत्र [महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ] महाहाऊसिंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

* भारतीय अमेरिकन श्री सैनी हिने मिस इंडिया वर्ल्डवाईड २०१८ चा किताब जिंकला आहे. ही सौदर्य स्पर्धा अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आयोजित करण्यात आली होती.

* ऑस्ट्रेलियाने अलीकडेच इस्रायलची राजधानी म्हणून पश्चिम जेरुसलेमला मान्यता दिली.

* स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटयूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील १०० सर्वात मोठ्या शस्त्र निर्मात्या कंपन्यांमध्ये ४ भारतीय सरकारी कंपन्यांचा समावेश आहे.

* नीती आयोग १६ डिसेंबर रोजी विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे.

* ११ डिसेंबर २०१८ रोजी रशियाचा अकेडमीक लोमोनोसोव्ह अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील पहिला तरंगता फ्लोटिंग अणुऊर्जा प्रकल्प ठरला आहे.

* भारत सरकारने आशियाई विकास बँकेसोबत एडीबी सोबत आसामसाठी ६० दशलक्ष डॉलरच्या ऋण करारावर स्वाक्षरी केली आहे.

* संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत धरण सुरक्षा विधेयक २०१८ सादर केले. या विधेयकात देशातील धरणांच्या सुरक्षेसाठी तरतूद करण्यात आली आहे.

* भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या एफटीआयआयच्या अध्यक्षपदी बी. पी. सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. 

सोमवार, १० डिसेंबर, २०१८

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ जाहीर - ११ डिसेंबर २०१८

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ जाहीर - ११ डिसेंबर २०१८

* MPSC मार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत गट-अ आणि गट-ब संवर्गातील विविध पदाच्या एकूण ३४२ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - रविवार १७ फेब्रुवारी आयोजित केली आहे.

* सदर परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

* यामध्ये गट अ आणि गट ब संवर्गातील विविध पदाच्या एकूण ३४२ जागा आहेत.
* उपजिल्हाधिकारी गट अ - ४० पदे, पोलीस उपअधीक्षक\सहायक पोलीस आयुक्त - ३४ पदे, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ पदाच्या - १६ जागा, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ पदाच्या - १६ जागा, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ - २ पदे, तहसीलदार गट अ - ७७ पदे, उपशिक्षणाधिकारी शिक्षणसेवा गट ब - २५ पदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब - ३ पदे, कक्ष अधिकारी गट ब - १६ पदे, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब - ११ पदे, उद्योग अधिकारी तांत्रिक - ५ पदे, नायब तहसीलदार गट ब - ११३ जागा

* शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा राज्य शासनाने मान्य केलेली समतुल्य पदवी धारण केलेली असावी. तसेच सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ पदासाठी वाणिज्य पदवी ५५% असणे आवश्यक आहे. उद्योग व उपसंचालक तांत्रिक गट अ पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब पदासाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी. अधिक अचूक माहितीसाठी जाहिरात पाहावी.

* वयोमर्यादा - उमेदवाराचे वय १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष आणि माजी सैनिक\अपंग उमेदवारांना १० वर्ष सवलत.

* परीक्षा फीस - खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ५२४ रुपये, तर मागासवर्गीयांसाठी उमेदवारासाठी ३२४ रुपये आहेत.

* अर्ज करण्याची शेवटची पद्धत - ३१ डिसेंबर २०१८ आहेत. 

शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन मिस वर्ल्ड २०१८ विजेती - ९ डिसेंबर २०१८

मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन मिस वर्ल्ड २०१८ विजेती - ९ डिसेंबर २०१८ 

* मेक्सिकोची वेनेसा पोन्स डी लिऑन मिस वर्ल्ड २०१८ ची विजेती ठरली आहे. चीन येथील हैनान शहरात ६८ व्या मिस वर्ल्ड सौन्दर्यस्पर्धेत विजेती ठरलेल्या मेक्सिकोच्या व्हॅनेसा पोन्स डी लिऑन हिला विजेती पदाचा मुकुट २०१७ ची विजेती भारताच्या मानुषी छिल्लर नेप्रदान केला. 

* या स्पर्धेत थायलंडची पिशापा उपविजेती ठरली. यंदाची मिस इंडिया तामिळनाडूची अनुकृती वास हिने या स्पर्धेत टॉप ३० मध्ये स्थान मिळविले. मात्र अंतिम १२ मध्ये तिला स्थान मिळू शकले नाही. 

* मिस वर्ल्ड वेनेसा हिने इंटरनॅशनल बिझनेसचा अभ्यास केला आहे. सध्या ती एका मुलीच्या पुनर्वसन केंद्राच्या संचालक मंडळात आहे. 

* अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मिस मेक्सीकोसह मिस थायलंड निकलेन पिशापा, मिस बेलारूस मारिया वसिल्विच, मिस जमायका कादिजा रॉबिन्सन, मिस युगांडा क्वीन.  

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.