रेल्वे अर्थसंकल्प २०१६-१७
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६-१७ चा रेल्वेचा दुसरा रेल्वे अर्थसंकल्प जाहीर केला. रेल्वे अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
* २०१५-१९ या काळात सुमारे ८.५ लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे रेल्वेचे उदिष्ट आहे.
* मानवरहित फाटकांना इतिहास जमा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
* येत्या वर्षात १,८४,८२० कोटीचे लक्ष्य, ८% उत्पन्न वाढविणार.
* रेल्वेची कर्मचारी संख्या १३,०७,१०९ लाख आहे यावरून रेल्वेची व्याप्ती आपल्याला लक्षात येईल.
* २०२० सालापर्यंत मालगाड्यांचा सरासरी वेग ५० तर जलद गाड्यांचा वेग ८० किमी करण्यात येईल.
* जेव्हा पाहिजे तेव्हा तिकीट २०२० पर्यंत लागू करण्यात येईल.
* पुढील वर्षी २५०० किमी नवे मार्ग उभारण्याचे लक्ष.
* रेल्वेमध्ये १ लाख २१ कोटीचे गुंतवणुकीचे लक्ष्य.
* रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देण्यात येईल.
* रेल्वेमधील सर्व पदे ऑनलाईन भरण्यात येईल.
* रेल्वेच्या पायाभूत सुविधावर येत्या ५ वर्षात ८.५ कोटी खर्च करणार.
* २०२० पर्यंत रेल्वेचा सरासरी वेग ५० किमी करण्याचे लक्ष्य.
* जनरल डब्यातही मोबाईल चार्जरची सुविधा देण्यात येईल.
* ४०० रेल्वेस्थानके पीपीपी नुसार तत्वानुसार विकसित करण्यात येईल.
* ई तिकीट साठी संकेतस्थळाची क्षमता वाढविली.
* रेल्वे स्थानकावर २५०० पाणी पिण्याच्या क्षमतेवर सुविधा उपलब्द करून देणार.
महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घोषणा
महाराष्ट्रासाठी नवे रेल्वे मार्ग
* पुणे - नाशिक, लांबी - २६५ किमी
* वैभववाडी - कोल्हापूर, लांबी - १०७ किमी
* इंदोर - मनमाड, लांबी - ३६८ किमी
* जेवूर - आष्टी, लांबी - ७८ किमी
* लातूर - नांदेड व्हाया लोहा, लांबी - १५५ किमी
* गडचिंदूर - आदिलाबाद, लांबी ७० किमी
* जालना - खामगाव, लांबी - १५५ किमी
* दौंड - मनमाड दुपदरीकरण, लांबी - १३६ किमी
या नवीन मार्गाचे होणार सर्वेक्षण
* पाचोरा - जामनेर - मलकापूर, लांबी - १०४ किमी
* बोधन - जळकोट, लांबी ६७ किमी
* नरखेड - वाशिम, १३० किमी
* मानवत - परळी वैजनाथ, लांबी ६७ किमी
* श्रीरामपूर - परळी, लांबी २३० किमी
* टिटवाळा - मुरबाड, २२ किमी
* गुलबर्गा - लातूर, १४८ किमी
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा