रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

२. ग्रामीण व नागरी पायाभूत संरचनेचा विकास

२. ग्रामीण व नागरी पायाभूत संरचनेचा विकास 

२.१ संरचनात्मक विकास : गरज आणि महत्व 

* संरचनात्मक विकास म्हणजे अशा सेवा की ज्या अर्थव्यवस्थेला उड्डाणावस्थेकडे नेतात.

* पायाभूत किंवा मूलभूत सेवांमुळे राष्ट्र उभारणीचा पाया घातला जातो. ज्याप्रमाणे कल्याणकारी राष्ट्रांनी कल्पना कृतीमध्ये आणली जाते.

* यामुळे समाजातील विविध घटकांना न्याय मिळतो. नागरिकांमध्ये दैनंदिन जीवन शांतपणे जाते. आरोग्यसेवा पर्यटनविषयक सेवा तसेच करमणूक सेवा यामुळे मानवीजीवन अर्थपूर्णता येते.

* संरचनात्मक विकासामुळे बाह्य बचतीमुळे निर्माण होण्याचा फायदा सर्वच क्षेत्रातील सर्वच उद्योगांना होऊ शकतो.

* प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्राची म्हणजेच शेती, उदयोग, व्यापार, यांची वाढ आणि विस्तार शक्य होतो.

* वस्तू व सेवांची वितरण व्यवस्था कार्यक्षम होते. त्यामुळे बाजारस्थितीचा फायदा उत्पादक उपभोक्त्यांना मिळू शकतो.

* मागणीप्रमाणे वस्तू व सेवांचा पुरवठा राहून किंमतवाढीला आळा घालणे शक्य होते. देशाच्या आर्थिक विकासाची पर्याप्त पातळी वाढविता येते.

२.२ भारतातील पायाभूत सेवांचा विकास 

* प्रत्येक पंचवार्षिक योजनेत संरचनात्मक विकासासाठी एकूण योजना खर्चाच्या जवळपास ५०% खर्च करण्यात आले.

* संरचनात्मक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशातील शेती व उद्योगाच्या विकासाला चालना मिळाली. कृषी उत्पादन ३ पटीने तर औदयोगिक क्षेत्रात ७ पटीने वाढ झाली.


२.२.१ ऊर्जानिर्मिती 

* आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ऊर्जा हा महत्वाचा घटक मानला जातो. आर्थिक वृद्धीचे प्रमाण, दरडोई उत्पन्न आणि दरडोई ऊर्जेचा वापर यांचा प्रत्यक्ष संबंध आहे.

* कोळसा आणि लिग्नाईट यांचा साठा २००९-१० मध्ये ५६६ मि. टन आहे. वर्तमान आणि भविष्यकालीन मागणीचा विचार करता १३० वर्षे पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्द आहे.

* तेल आणि गॅस देशातील तेलाचे साठे मर्यादित असून फक्त २० ते २५ वर्षे पुरेल एवढेच तेल साठे देशात उपलब्द आहेत.

* विद्युतनिर्मिती औष्णिक आणि अणुशक्तीच्या तुलनेत जलविद्युत अधिक स्वस्त व फायद्याची असल्याने जलविद्यूत मार्गाचा अधिक विस्तार झाला असला तरीही एकूण विदयुतनिर्मितीत वाटा १३% औष्णिक आणि ८४% आण्विक ऊर्जेचा वाटा ३% आहे.

* व्यापारेतर मार्ग - यात जळाऊ शेतीतील टाकाऊ वस्तू जनावरांचे शेण इत्यादींचा समावेश होतो. स्वयंपाकासाठी इंधनाची गरज जळाऊ लाकडामार्फत पुरी होते.

* अपारंपरिक ऊर्जास्रोत - सौरस्त्रोत, पवनऊर्जा, व समुद्राच्या पाण्याच्या लाटांची शक्ती हे तीन अपारंपरिक मार्ग भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्द असूनही त्यांचा वापर फारच मर्यादित आहे.

२.२.२ वाहतूक 

* शेती उदयोग अर्थव्यवस्थेचा पाया समजला जातो. तर वाहतूक आणि दळणवळण यांना अर्थव्यवस्थेच्या नाड्या समजले जाते.

* वाहतुकीमुळे मानवी श्रम आणि इतर साधनसामुग्रीला गतिमानता प्राप्त होते. सहजपणे स्थलांतर शक्य होते.

* उत्पादकाचे प्रमाण जसे शेती आणि औद्योगिक क्षेत्रात वाढत जाईल त्या प्रमाणात वाहतुकीची गरज व त्या सेवांची मागणी वाढते.

[ रस्ते वाहतुकीची उपयुक्तता ]

* देशाच्या आर्थिक विकासात रस्तेबांधणी आणि रस्ते वाहतूक महत्वाची भूमिका बजाविते. रस्तेबांधणी, देखभाल या संदर्भात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्द होतो.

* देशातील दुर्गम भाग रस्त्याशी जोडला जातो. रस्ते वाहतूक ही अधिक जलद, अधिक लवचिक, अधिक सोईची असते. रेल्वेमार्ग निश्चित असतात. त्यांच्या मार्गात लवचिकता नसते.

* भारत हा खेड्यांचा देश आहे. रस्ते वाहतुकीमुळे खेडी जोडली गेली. खेड्यापर्यंत विकास रस्त्यापर्यंत पोहोचू शकतो.

* रेल्वे शहरांना सुविधा देते. रस्ते मात्र कमी अंतरासाठी उपयुक्त ठरतात. रेल्वेपर्यंत प्रवासी आणि वस्तू पोहोचविणे रस्त्यामुळेच शक्य होते.

* प्रामुख्याने शेती-शेतकऱ्यांच्या दृष्टीने रस्ते वाहतूक अधिक उपयुक्त ठरली आहे. दुष्काळाची तीव्रता कमी करणे समस्यांमुळे शक्य झाले आहे.

* देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने रस्ते वाहतूक अधिक महत्वाची आहे. रस्ते जितके चांगले तेवढी इंधन बचत, वेळेची बचत होते उत्पादकता वाढते.

[ रस्ते वाहतुकीच्या समस्या ]

* रस्त्यांची रुंदी कमी आहे. १५% राष्ट्रीय महामार्ग आणि ७५% राज्य महामार्ग एकमार्गी आहेत. रस्त्यांची जाडी कमी आहे.

* रस्तेबांधणीसाठी निकृष्ट साहित्याचा वापर, त्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे. उदा सुवर्ण चतुष्कोण योजना

* कमकुवत व अरुंद पूल शहरी भागातील अत्यंत रस्ते आणि भारी वाहतूक त्यामुळे प्रदूषणात पडणारी भर.

* रस्ते सुरक्षितता, सावधानता याकडे दुर्लक्ष, कडक नियमांचा अभाव, रस्ते देखभालीत ठिसाळपण, टिकाऊ रस्त्यांचे प्रमाण कमी.

* रेल्वे क्रॉसिंग व्यवस्थित नाहीत. वरील समस्या कमी करण्यासाठी संरचनात्मक सुधारणांची गरज आहे.

[ विमान वाहतुकीच्या समस्या ]

* प्रगत देशाच्या दृष्ट्टीने विमान वाहतूक सुविधा गरजेच्या मानाने अपुरी आहे.
* विमानतळांची संख्या कमी आहे. त्यांची गुणवत्ता खूपच कमी आहे.
* विमानांच्या फेऱ्या, विमानांतर्गत सेवा सुविधा कमी आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे खूपच कमी आहेत.
* विमान वाहतुकीचा खर्च तुलनेने जास्त आहे.
* दीर्घकाळ सरकारची मक्तेदारी असलेल्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स या कंपन्यांमुळे विमान वाहतूक विस्तारू शकली नाही.

२.२.२ दळणवळण 

१] भारतीय टपालसेवा  - १९७२ पासून भारतात पिन कोड सुविधा चालू करण्यात आली आहे. भारतामध्ये टपाल कचेऱ्यांची संख्या ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त आहे. पोस्टाच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

२] दूरध्वनी - टेलिकम्युनिकेशन ही संपर्क सेवाक्षेत्रात महत्वपूर्ण जोड आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान प्राप्त करण्याकरिता व्यावसायिकांना या सेवेचा उपयोग होतो. ग्रामीण भारतात टेलिफोन जोडण्याचा वेग १.२% असून तो २०१० साली २१% पर्यंत वाढला.

३] आकाशवाणी,दूरदर्शन,इंटरनेट - भारतात १९२० साली आकाशवाणी रेडिओ प्रक्षेपणाला सुरुवात झाली. तर १९५९ साली भारताचे पहिले दूरदर्शन प्रसारण करण्यात आले. AIR रेडिओची स्थापना १९३६ साली करण्यात आली होती. सध्या भारतामध्ये जवळपास २०० रेडिओ केंद्र संपूर्ण भारतात प्रसारणाचे कार्य करतात. २००४ सालापासून शासनातर्फे DTH सेवा सुरु करण्यात आली.

४] माहिती व तंत्रज्ञान - संगणकाच्या साहाय्याने माहितीचे प्रसारार्ण करणे अभिप्रेत आहे. विशेष क्षेत्रांना, गटांना लागणारी माहिती, माहितीचे विश्लेषण, मांडणी, सादरीकरण ज्या अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने केले जाते.

* विज्ञान व तंत्रज्ञान - विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराने माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली. देशाचा वेगाने विकास होण्यासाठी आर्थिक आणि आर्थिकेतर प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आवश्यक झाला आहे.

* वित्तीय सेवा किंवा संरचना - देशाच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला करण्याची व्यवस्था म्हणजे देशातील सक्षम वित्तीय सेवा होय.

२.२.४ पाणीपुरवठा 

* असे म्हटले जाते की मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगाची पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण होऊ शकेल एवढे पाणी भरपूर उपलब्द आहे.

* पण पाण्याच्या विवेकी नियोजनाच्या अभावामुळे शहरी आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात पाणीपुरवठा ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे.

* देशात सरासरी वार्षिक ११०० मिमी पाऊस पडत असला तरीही संपूर्ण देशात पाऊस पडण्याचे प्रमाण असमान आहे.

* भारतात कूपननलिकांचा शेतीसाठी सन १९६० मध्ये फक्त १ टक्का होत होता. आता तो ३०% इतका वाढला आहे.

* मोसमी पावसाचे ८० ते ९०% पाणी वर्षानुवर्षे वाया जाते आणि उन्हाळ्यात मात्र तीव्र पाणी टंचाईला सुविधा अनुभवावी लागते.

* शुद्ध पाण्याबरोबरच अशुद्ध पाणी प्रक्रिया योजना तसेच मलनिस्सारण योजनांचा अभावच आहे. त्यामुळे जलप्रदूषण वाढते आहे.

२.२.५ गृहनिर्माण 

* १९९१ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये निवासी संकुलाची कमतरता आहे. ग्रामीण भागात १३.७ दशलक्ष तर ग्रामीण भागात ४.८ दशलक्ष निवासी संकुलाची आवश्यकता आहे.

* महाराष्ट्र राज्यात गृहनिर्माण मंडळ निर्माण करण्यात आले. एकूणच देशभरात असलेली घरांची कमतरता लक्षात घेऊन १०९.५३ लाख घरे उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आणि घरांची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्याचे ठरविले.

* नवव्या पंचवार्षीक योजनेत गृहबांधणीसाठी ग्रामीण भागात १४,३०० कोटीची गुंतवणूक गरजेची समजण्यात आली आहे.

२.२.७ पायाभूत सुविधांशी निगडित भारतातील समस्या 

* सेवा सुविधांचा अपुरेपण - सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि मागणीच्या प्रमाणात सेवा सुविधांचा पुरवठा मर्यादित आहे.

* अकार्यक्षमता - शासकीय कर्मचाऱ्यांची उदासीनता, अधिकारी वर्गाचा निष्काळजीपणा यामुळे सेवांमुळे पुष्कळसा खंड पडतो.

* समन्वयाचा अभाव - दूरसंचार सेवा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, यांचा कारभार विविध शासकीय खात्याकडे आहे.

* खर्चामध्ये वाढ - विविध पायाभूत सुविधा देताना मूळ अंदाजपत्रकातील तरतूद आणि प्रत्यक्षात आलेला खर्च यात पुष्कळशी तफावत जाणवते.

* तांत्रिक स्वरूपाच्या समस्या - पुष्कळदा खरेदी केलेली सामुग्री न वापरलेल्या स्थितीत पडून असते.

* खासगी क्षेत्रांच्या स्पर्धा - वाहतूक, टपाल तारसेवा शिक्षण क्षेत्र, वैदयकीय सेवा या क्षेत्रामध्ये सार्वजनिक खासगी क्षेत्राने प्रवेश केला आहे.

* असमतोलत्व - ग्रामीण भाग, आणि शहरी भाग असा तौलनिक विचार केला असता, शहरी भागात पायाभूत सुविधा जेवढ्या उपलब्द आहेत तेवढ्या ग्रामीण भागात त्या नाहीत.

* तुटपुंजी तरतूद - पायाभूत सुविधा सर्व नागरिकाना सर्वत्र उपलब्द व्हाव्यात यासाठी शासन विविध उपक्रम आखते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.