सोमवार, २० जून, २०१६

हरित रसायनशास्त्र

हरित रसायनशास्त्र 

* जगामध्ये भौतिक सुखासाठी अनेक प्रयोग केलेले आहे. आपले आरोग्य आणि दैनदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निरनिराळे संशोधन झालेले आहे.

* आज मानवाला सुंदर, प्रदूषण विरहीत वातावरणाची आवश्यकता जाणवू लागली आहे. शुद्ध हवा, निर्जंतुक पाणी आणि ताजे अन्न या अलीकडच्या मानवी गरजा आहेत.

* त्यासाठी हरित रसायनशास्त्र म्हणजे मानवाची प्रतिकार शक्ती व तेजस्वीपणा वाढविणारे शास्त्र आहे. तसेच मानवाला दिर्घायुष्याकडे पोहोचविण्याचा महामार्ग आहे.

* नैसर्गिकरित्या विघटन होणार्या पदार्थाची निर्मिती करणे, अभिक्रिया कारक, आणि उत्पादित घटक यामधील मध्यस्त घटक दूर करणे.

* रासायनिक अभिक्रियांचा आराखडा तयार करताना उत्पादित पदार्थाचे अन्य घटक रासायनिक पदार्थामध्ये रुपांतर होणार नाही याची काळजी घेणे.

* पृथकरण पद्धतीमध्ये सुधारणा करणे, त्यासाठी नवीन उपकरणे उपयोगात आणणे. नैसर्गिक उत्प्रेरकाचा उपयोग करणे.

* नैसर्गिक उत्प्रेराकाचा उपयोग करणे म्हणजे उत्पादनात निरनिराळी वनस्पतीची पाने, फुले, फळे, मुळाचा रस, बुरशी, शेवाळ, कवक, खडक, व गाळ यांच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रियांची गती वाढविणे.

* विषारी रसायनांचा उपयोग टाळावा, रासायनिक क्रियेमध्ये आवशक्यता असेल तरच उष्णतेचा उपयोग करणे.

* द्रावकमुक्त रासायनिक अभिक्रियांचा उपयोग करणे, रासायनिक अभिक्रियांची मांडणी करताना जास्तीत जास्त अभिक्रिया कारकांचे रुपांतर उत्पादनामध्ये होईल अशी व्यवस्था करणे.

* कच्या मालाचा पुन्हा पुन्हा उपयोग करणे, टाकावू पदार्थाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.














  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.