बुधवार, ११ एप्रिल, २०१८

देशात भाजपा सर्वात श्रीमंत पक्ष - ११ एप्रिल २०१८

देशात भाजपा सर्वात श्रीमंत पक्ष - ११ एप्रिल २०१८

* देशातील सात प्रमुख राजकीय पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात श्रीमंत पक्ष असल्याचे या पक्षांनी दाखल केलेल्या वर्ष २०१६-१७ च्या प्राप्तिकर विवरणपत्रावरून दिसुन येते.

* उत्पन्नाच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भाजपच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत असला तरी उत्पन्नाहून खर्च अधिक असल्याने हा पक्ष घाट्यात असल्याचेही स्पष्ट होते.

* राजकीय पक्षांच्या प्राप्तिकर विवरांपत्रांचे  विश्लेषण करून [असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स] एडीआर या स्वयंसेवी संस्थेने एक तौलनिक अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला.

* त्यानुसार गेल्या वर्षी भाजपने १०३४.२७ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे. सर्व पक्षांच्या एकत्रित उत्पन्नाचा विचार केला तर त्यातील एकट्या भाजपचा वाटा ६६.३४% आहे.

* काँग्रेसला गेल्या वर्षी २२५ कोटीचे उत्पन्न मिळाले. तर या पक्षाने ३२१ कोटी रुपयाचा खर्च केला. गेल्या वर्षी या सात राजकीय पक्षांनी मिळून १५५९ कोटी रुपयांचे उत्पन्न व एकूण १२२८ कोटी रुपयांचा खर्च जाहीर केला.

* भाजपाला सर्वाधिक ९९७ कोटी रुपये उत्पन्न ऐच्छिक देणग्यांमधून मिळाले. पक्षाने यापैकी ६०६ कोटी रुपये प्रचारावर खर्च केले तर प्रशासकीय कामावर ६९ कोटी रूपयांचा खर्च केला.

* सात प्रमुख पक्षांपैकी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि कम्युनिस्ट पक्ष हे चार पक्ष गेली सलग ५ वर्ष विलंबाने हिशेब सादर करत आल्याचेही अहवालात सादर करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.