गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

जगातील सर्वात उंच स्टॅचू ऑफ युनिटी पुतळ्याचे भारतात लोकार्पण - १ नोव्हेंबर २०१८

जगातील सर्वात उंच स्टॅचू ऑफ युनिटी पुतळ्याचे भारतात लोकार्पण - १ नोव्हेंबर २०१८

* भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅचू ऑफ युनिटीचे आज लोकार्पण झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती आहे.

* त्याचेच औचित्य साधत या पुतळ्याचे लोकार्पण झाले. सरदार पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. या पुतळ्याची उंची १८२ मीटर आहे.

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदी किनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले.

* भाजपने या सोहळ्याची जय्यत तयारी केली होती. मागील काही महिन्यापासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आला होता.

* या पुतळ्याचे एक मराठी कनेक्शन असून शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारला आहे. देशाच्या जडणघडणीतले सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान फार मोठे आहे.

* तसेच आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांच्या या भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळ्याला स्टॅचू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले आहे.

[स्टॅचू ऑफ युनिटीचे वैशिट्ये]

* स्टॅचू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.
* यापूर्वी अमेरिकेतील स्टॅचू ऑफ लिबर्टी हा ९३ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा होता.
* १८२ मीटर ५९७ फूट उंचीचा हा पुतळा लार्सन अँड टर्बो कंपनीने केवळ ३३ महिन्यामध्ये बांधून पूर्ण केला.
* १३५ मीटर [४४३फूट] वर अभ्यागत आसपासचा देखावा पाहू शकतात येथे पोचण्यासाठी दोन लिफ्टचा वापर करता येतो.
* लार्सन अँड टर्बो निर्मित हा पुतळा १८० किमी प्रतितास इतक्या जोराचा वारा झेलू शकतो व ६.५ रिक्टर इतक्या क्षमतेचा भूकंप रोधण्याची क्षमता यात आहे.
* पुतळ्याच्या काँक्रीट गाभेसाठी - २१०,००० क्यू मी काँक्रीट, ७०,००० टन सिमेंट, १८५०० टन लोखंड यासाठी वापरले जाईल. ६५०० टन संरक्षणात्मक लोखंड या ढाच्यासाठी वापरले. ६५०० ब्राँझ ची पॅनल ज्याचे वजन १,७०० टन यासाठी वापरले .
* स्मारक परिसरात एक कायमस्वरूपी मोठे प्रदर्शन केंद्र, एक स्मृती बाग, साधू बेट व मुख्य भूभागाला जोडणारा एक सुंदर पूल, प्रशासकीय भवन, स्टार हॉटेल श्रेष्ठ भारत भवन व कॉन्फरन्स हॉल आदी सुविधांचा समावेश आहे.
* अवघ्या ५ वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.
* नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
* सरदार पटेल भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा पुतळा उभारण्यासाठी लोखंड गोळा करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्याकडून लोखंड गोळा करण्यात आले.
* जमा केलेले लोखंड वितळून पुतळ्याचा याचा पाया रचण्यासाठी त्या लोखंडाचा वापर करण्यात आला.
* या भव्य पुतळ्याच्या बांधणीसाठी २५ हजार टन लोखंड आणि ९० हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आला.
* देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे थ्री स्टार निवासाची व्यवस्था असून एकूण १२८ खोल्या बांधण्यात आल्या आहेत.
* या स्मारकाच्या उभारणीसाठी २,९८९ रुपये खर्च आला असून २५०० कामगारांनी या प्रकल्पावर काम केले आहे. दरवर्षी या पुतळ्यामुळे १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल. असा अंदाज आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.