रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

जागतिक महिला मुष्टीयोद्धा स्पर्धेत मेरी कोमला विश्वविजेतेपद - २६ नोव्हेंबर २०१८

जागतिक महिला मुष्टीयोद्धा स्पर्धेत मेरी कोमला विश्वविजेतेपद - २६ नोव्हेंबर २०१८

* 'मॅग्निफिसंट मेरी' म्हणून भारतीय महिला मुष्टीयुद्धात प्रसिद्ध असलेल्या मेरी कोमने देशाला अभिमान वाटेल अशी ऐतिहासिक कामगिरी करताना सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवले.

* तीन मुलांची आई आणि वय वर्षे ३५ असतानाही तिने जागतिक विजेतेपदाला थाटात गवसणी घातली. महिलांच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरीने आजच्या अंतिम सामन्यात युक्रेनच्या हाना ओखाटाचा ५-० असा धुव्वा उडविला.

* ४८ किलो वजनी गटाच्या गटातही तिला खेळणे मुश्किल झाले होते. तीच सुपरमॉम ५१ किलो वजनी गटात विश्वविक्रम करणारी बॉक्सर ठरली. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये मेरीकोम शनिवारी युक्रेनची युवा बॉक्सर हाना ओखोटोचा ५-० असा पराभव करत सहाव्यांदा विजेती ठरली.

* मेरी कोमचे विश्व चॅम्पियनशिप मधील हे सातवे पदक असून ६ सुवर्ण व १ रौप्य पदके आहेत. रौप्य पदक २००१, व सुवर्ण पदक अनुक्रमे २००२, २००५, २००६, २००८, २०१०, २०१८ असे आहेत.

* मेरी कोमने ४८ किलो वजनी गटात अंतिम फेरीत पाच वेळा विजेतेपद मिळविले होते. ६ वेळा गोल्ड मिळवून मेरीने आयर्लंडच्या केटी टेलरचा पाच जेतेपदांचा विक्रम मोडीत काढला.

* या विजेतेपदानंतर मेरीने सर्वांचे आभार मानले व सांगितले की २०२० टोकियो जपान येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.