बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८

काही विशेष चालू घडामोडी - २९ नोव्हेंबर २०१८

काही विशेष चालू घडामोडी - २९ नोव्हेंबर २०१८

* केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्याना गृहपाठ न देण्याचे निर्देश दिले आहे. 

* भारत रशिया दरम्यान पहिला रणनीतीक सामरिक आर्थिक संवाद २५ नोव्हेंबर २०१८ रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे करण्यात आले. 

* महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ ज्येष्ठ बासरी वादक पं केशव गिंडे यांना जाहीर झाला. 

* अलीकडेच इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१९ सहावी आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली. या अहवालात रोजगार प्रदान करण्याच्या बाबतीत आंध्रप्रदेश राज्य प्रथम स्थानावर आहे. 

* पर्वतीय औषधींवर १२ व्या जागतिक काँग्रेसचे आयोजन नेपाळमधील काठमांडू येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले. 

* लखनऊ येथे सुरु असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या समीर वर्माने पुरुष एकेरीचे आपले विजेतेपद राखले. 

* आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची एकमताने निवड झाली. 

* महिला टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ८ गड्यानी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने चौथ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. 

* शुभंकर शर्मा युरोपियन टूरचा सर हेनरी कॉटन रुकी ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय गोल्फर ठरला आहे. २०१८ च्या जागतिक टूर चॅम्पियनशिपमध्ये त्याने ४१ वे स्थान प्राप्त केले. 

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने करतारपूर साहिब कॉरिडॉर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

* केंद्र सरकार गुरुदासपूर जिल्ह्यातून पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडॉरचे निर्माण करणार आहे. 

* केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे मिशन रक्षा ज्ञान शक्ती सुरु केले. या अभियानाचा मुख्य उद्देश स्वदेशी संरक्षण निर्मिती क्षेत्रात बौद्धिक संपदा अधिकार संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.

* येथील जागतिक कीर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी राजस्थानमधील ताल छापर राष्ट्रीय उद्यानात काढलेल्या डेथ ऑन विंग्स या छायाचित्राला सेंचुरी एशिया च्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने मुंबईत गौरविण्यात आले.

* १४ व्या एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उदघाटन सोहळा कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवित असलेल्या भारतामध्ये याआधी १९८२ आणि २०१० साली विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला होता.

* भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्रोने तयार केलेल्या हायपर स्पेक्ट्रल इमेजींग सॅटेलाईट चे एचवायएसआयएस पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाच्या मदतीने उद्या प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

* करचोरी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत आणि चीनने डीटीएए करारातील डबल टॅक्सेशन अव्हॉडन्स अग्रीमेंट सुधारणासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

* भारतीय चित्रपट निर्मात्या नंदिता दास यांना यावर्षीचा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोशिएशन्स पुरस्कार जाहीर झाला आहे.

* आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने पीएसएलव्ही सी ४३ प्रक्षेपकाद्वारे ३१ उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले. या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीवरील वातावरणातील हालचाली, हवामान बदल, यावर देखरेख ठेवणार आहे.

* ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद अझिझ यांचे २७ नोव्हेंबर रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले आहे.  त्यांनी आपल्या कारकिर्दीत माय नेम इज लखन, आप के आ जाणे से, दिल ले गयी तेरी बिंदिया अशी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहे.

* मराठा समाजाला शिक्षण व सरकारी नोकऱ्यांत १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले असून त्यावर राज्यपालाची स्वाक्षरी घेण्यात आली.

* अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचचे दुसरे अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलन ७ व ८ एप्रिल २०१९ रोजी अकोल्यात होणार आहे.

* अतिरिक्त पिकणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता ज्वारी बाजरी, मका, वाया जाणारी फळे आणि भाजीपाला त्यापासूनही इथेनॉल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

* २०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतापर्यंत केवळ उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याला देशात परवानगी होती.

* इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे. पीएसएलव्ही-सी ४२ या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी ३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण इस्रोने गुरुवारी केले.

* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांना वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस लेनोवो प्राईज या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

* राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी व शिक्षकाना सातवा वेतन अयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी बक्षी समितीचा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. हा अहवाल आल्यानंतर १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल.

* फोर्ब्स नियतकालिकाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ५० सर्वश्रेष्ठ अमेरिकी महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या चार महिला आहेत. सिस्कोच्या माजी तंत्रज्ञान अधिकारी पदमश्री वॉरियर, उबेरच्या वरिष्ठ संचालक कोमल मंगतानी कॉन्फ्लूएन्टच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी तथा सहसंस्थापक नेहा नारखेडे, कामाक्षी शिवराम कृष्णन या चौघीचा यादीत समावेश झाला आहे.

* राज्यातील मराठा समाजाला शिक्षणात तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी अधिसूचना महाराष्ट्र सरकारने शनिवारी जारी केली असून त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईबीसी प्रवर्गात या समाजाला हे आरक्षण तत्काळ लागू झाले.

* तीन वेळा अजिंक्यवीर ठरलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या फॅबीअनो करुणाचा पराभव करून विश्वविजेतेपद आपल्याकडे राखले.

* ड्रोनचा वापर करण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळाली असून त्यामुळे ड्रोन इंडस्ट्रीला चालना मिळणार आहे. तसेच सामान्य नागरिकही काही अटी व नियमावर दिवसा ड्रोन वापरू शकतील.

* राज्यातील १० हजार गावामध्ये स्टेज ऑफ महाराष्ट्र ऍग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन स्मार्ट २,३०० कोटी रुपये खर्चाची महत्वाकांक्षी योजना सुरु करण्यात येणार असून तिचा ७० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.

* चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरु केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जीनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह स्थानकातून पाठवण्याचे ठरवले आहे.

* आखाती युद्ध सुरु करणारे आणि शीतयुद्धाच्या शेवटच्या काळातील साक्षीदार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश वय ९४ यांचे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले.

* विधानसभेच्या गेल्या चार वर्षपासून रिक्त असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली.

* कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातर्फे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या [एनएसडीसी] अध्यक्षपदी लार्सन टर्बो या बहुराष्ट्रीय कंपनीचे माजी संचालक ए. एम. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

* भारताचा स्टार नेमबाज अभिनव बिंद्राला आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनकडून आयएसएसएफ अभिनव बिंद्राला [ब्लू क्रॉस] या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* शालेय विद्यार्थ्याना भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील सर्व २२ भारतीय भाषांचा परिचय करून देण्यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने 'भाषा' संगम' नावाचा उपक्रम सुरु केला आहे.

* सशस्त्र सैन्यदलाच्या प्रमुखपदी एका महिलेची नेमणूक करणारा स्लोव्हेनिया हा नाटोचा पहिला सदस्य देश ठरला आहे.

* ब्रुसेल्समध्ये बेल्जीयम २५ नोव्हेंबर रोजी आयोजित युरोपियन युनियनच्या विशेष परिषदेत २७ देशांच्या नेत्यांनी ब्रिटनच्या ब्रेग्झिट प्रस्तावास मान्यता दिली.

* देशातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचावणाऱ्या महत्वाकांक्षी सौभाग्य योजनेअंतर्गत ८ राज्यामध्ये सर्व घरात विद्युतपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

* प्रसिद्ध सतार आणि सुरबहार वादक उस्ताद इमरत खान यांचे २२ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत हृदयविकाराने निधन झाले.

* संयुक्त राष्ट्रसंघाने [वैश्विक शाश्वत शहरे २०२५] या उपक्रमामध्ये भागीदारीसाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडा या शहरांची निवड केली आहे.

* भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या अंतर्गत क्वाड्रीसायकल या वाहनाला गैर-परिवहन वाहन श्रेणीत समाविष्ट केले आहे.

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत हवामान संबंधित आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्रज्ञ संघटनेने अलीकडेच ग्रीनहाऊस गॅस बुलेटिन नावाचा वार्षिक अहवाल जारी केला आहे.

* महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य [रामसार] यादीत समाविष्ट होणार आहे.

* भारतात पहिल्या इंजिनविना धावणारी ट्रेनने २ डिसेंबर रोजी झालेल्या चाचणीत प्रतितास १८० किमी वेग गाठला. ही चाचणी कोटा सवाई माधवपूर विभागात ही चाचणी घेण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.