सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

नासाचे इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले - २७ नोव्हेंबर २०१८

नासाचे इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले - २७ नोव्हेंबर २०१८

* नासाचे इनसाइट [इंटरिअर एक्स्प्लोरेशन युजींग सिस्मिक इन्वेस्टीगेशन यान मंगळ ग्रहावर उतरविले आहे. सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १ वाजून २४ मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले.

* नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरविताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान ६ मिनिटात शून्य वेगावर आले.

* त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले. आणि लँड झाले. दरम्यान इनसाईटने मंगळ ग्रहावरून आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.

* सहा महिन्याच्या प्रवासानंतर इनसाईटने मंगळावर लँड केले. नासाच्या या प्रकल्पासाठी १ बिलियन डॉलर म्हणजेच ७० अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहे.

* सौर ऊर्जा आणि बॅटरीने ऊर्जा मिळवणाऱ्या लँडरला २६ महिन्यापर्यंत संचलित केले जाऊ शकते. परंतु नासाला यापेक्षा अधिक कालावधी ते सुरु राहू शकेल अशी अपेक्षा आहे.

* नासाने म्हटले आहे की इनसाईट यान पृष्ठभागावर १० ते १६ फूट खोल खड्डा करेल. यापूर्वी मंगळ अभियानाच्या तुलनेत हे १५ टक्के अधिक खोल असेल.

* २०३० पर्यंत मनुष्याला मंगळावर पाठवण्याच्या प्रयत्नासाठी नासाला मंगळ ग्रहाचे तापमान समजणे महत्वाचे आहे.

* इनसाईट यान हे मंगळावरील मानव मिशनपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर उतरणे आणि येणाऱ्या भूकंपाचे मापन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. यानातील सिस्मोमीटरच्या मदतीने मंगळावरील अंतर्गत परिस्थितीचा अभ्यास केला जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.