शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

राज्यात लवकरच ७२ हजार पदाची मेगाभरती - ८ डिसेंबर २०१८

राज्यात लवकरच ७२ हजार पदाची मेगाभरती - ८ डिसेंबर २०१८

* मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यामुळे स्थगित करण्यात आलेली ७२ हजार शासकीय रिक्त पदावरील मेगा भरती सुरु करण्यात येत असून, फेब्रुवारी २०१९ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी दिले.

* यासाठी फडणवीस सरकारने वॉर रूम सुरु केली असून त्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे तसेच या मेगाभरतीसाठी राज्यपालांची स्वाक्षरी घेण्यात आली असून लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले ही भारती घेण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

* या ७२ हजार पदापैकी जवळपास ८० टक्के पदे ही जिल्हास्तरावरील आहेत. सध्या बिंदू नामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य व वन विभागात ही भरती होणार आहे.

* या संदर्भात मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सचिव गटाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. ही सगळी पदे फेब्रुवारी २०१९ पर्यंत भरून त्यांना नेमणूकपत्र देण्यात येईल. तरी सर्व विदयार्थ्यांनी अभ्यास करून संधीचा उपयोग करावा.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.