भारतातील इंग्रज गवर्नर जनरल

वॉरन हेस्टिंगची कारकीर्द - [ १७७२ - १७८५ ]
* सन १७७२ साली हेस्टिंग याची बंगालचा गवर्नर म्हणून नियुक्त झाला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती. बंगालमध्ये अराजकसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. शहा आलम बादशाहने मराठ्यांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर या दोन सत्ता प्रबळ बनल्या होत्या. हेस्टिंगने कंपनीच्या कल्याणासाठी अनेक प्रकारच्या महसुली व सुधारणा केल्या. व कंपनीचा खजिना भरून काढण्यासाठी न्यायान्याय याची चाड बाळगली नाही.

* हेस्टिंगच्या काळात पहिल्या इंग्रज व मराठा युद्धाचा १७७८ - ८२ मध्ये झाला. नारायणरावानंतर वधानंतर राघोबा पेशवा बनला होता. सालबाईच्या तहाने १७८२ मध्ये हे युद्ध थांबले. इंग्रजांना मराठ्यापासून ठाणे व साष्ठी ठिकाणे व १२ लाख रुपये प्राप्त झाले.

* दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करून हैदर अलीने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. या हैदरबरोबर सन १७६६ - ६९ या काळात इंग्रजांचे पहिले युद्ध घडून आले होते. परंतु इंग्रजांना त्यात फारसे यश मिळाले नव्हते. हैदरशी दुसरे युद्ध सन १७८० मध्ये सुरु झाले होते. हैदर १७८२ मध्ये मृत्यू पावल्यावर त्याच्या पुत्राने टिपूने हे काम चालूच होते. शेवटी सन १७८४ मध्ये मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा काही फायदा झाला नाही.

* इतिहासकार कॉटन च्या मते सन १७८४ मध्ये विलायत सरकारने [ पिट्स इंडिया अक्ट मंजूर करून कंपनीवर देखरेख करणाऱ्या बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती केली. कलकत्त्याच्या गवर्नर जनरलला निर्णायक अधिकार प्राप्त झाले. मुंबई व मद्रासचे गवर्नर त्याच्या पूर्ण वर्चस्वाखाली आले.

   
लॉर्ड कॉर्नवॉलीस कारकीर्द -[१७८६ - ९३]
* लॉर्ड कॉर्नवॉलीस हा अत्यंत कार्यक्षम असा गवर्नर होता. कॉर्न वॉलीस चे धोरण शक्यतो परक्या राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचे होते. तरीही त्यास टीपुशी युद्ध करावे लागले. या युद्धात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.

* सन १७९२ च्या श्रीरंगपट्टनमच्या तहाने हे युद्ध संपले आणि टिपुला अर्धे राज्य व साडेतीन कोट रुपये द्यावे लागले. कॉर्न वॉलीस नंतर सर जॉन शोअर सन १७९३ - १७९८ हा कंपनीचा गवर्नर होता. त्यानेही अनाक्रमनाचे व तटस्ततेचे धोरण स्वीकारले.


वेलस्लीची कारकीर्द सन [१७९८ - १८०५]
* हिंदी लोकांच्या स्वास्थ्यासाठी इंग्रजांना एकछत्री अंमल हवा होता. असे त्याचे मत आहे. हिंदी राजांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी  त्यांचा अधिकाधिक प्रदेश आपल्या ताब्यात आणण्यासाठी त्याने [ तैनाजी फौजेची योजना ] राबविली.

* वेलस्ली तैनाती फौजेची प्रथम निजामावर प्रयोग केला. निजामाने आपल्या पदरी असलेले फ्रेंच अधिकारी व फौज हाकलून देवून तैनाती फौज स्वीकारली व तिच्या खर्चाची रक्कम देण्याचेही मान्य केले. निजामाचे परराष्ट्र धोरण इंग्रज ठरवू लागले. त्यानंतर वेलस्लीने टिपुकडे मोर्चा वळविला. टिपुने फ्रेंचाशी संधान बांधले होते. त्याचा धोका वेळीच नष्ट करणे आवश्यक होते. म्हणून इंग्रज व निजाम यांच्या फौजावर टिपू चालून आला.

* ४ मे १७९९ च्या श्रीरंगपट्टमच्या लढाईत मारला गेला. इंग्रजांनी निजामाला गुप्ती व गुरुमकोंडा हे प्रदेश दिले व आपणाकडे कारवार, कोईमतूर, श्रीरंगपट्टम हा महत्वाचा प्रदेश घेतला.

* वेलस्लीच्या कारकिर्दीत दुसरे इंग्रज व मराठा युद्ध १८०२ - १८०४ घडून आले. या वेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर होता. वेलस्लीनंतर तटस्त धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिसची हिंदुस्तानात दुसऱ्यांदा गवर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या मृत्यूनंतर सर बार्लो १८०५ - १८०७ गवर्नर जनरल होता. बार्लो नंतर लॉर्ड मिंटो हा गवर्नर जनरल झाला. यांच्या कारकिर्दीत शीख राज्य यांच्यात सतलज हि हद्द ठरविण्यात आली. याच सुमारास विलायत सरकारने १८१३ चा चार्टर अक्ट पास करून कंपनीची हिंदुस्तानातील व्यापाराची मक्तेदारी नष्ट केली. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या मार्फत विलायत सरकार कंपनीच्या कारभारावर अंतिम अधिकार गाजवेल असे जाहीर करण्यात आले.


लॉर्ड हेस्टिंगची कारकीर्द - [१८१३ - १८२३]
* लॉर्ड हेस्टिंग हा अनाक्रमणवादी गवर्नर जनरल होता. १८१६ च्या तहानुसार नेपाळपासून तराई, गढवाल, व कुमाऊ हा प्रदेश ताब्यात घेतला. हेस्टिंगच्या कारकिर्दीत तिसरे व शेवटचे इंग्रज - मराठा युद्ध खेळले गेले १८१७ - १८१८ इंग्रजांच्या बंधनातून बाहेर पडण्याचा शेवटचा प्रयत्न बाजीरावचे केला, पण तो यशस्वी झाला नाही.

* नागपूरच्या गादीवर नवा राजा बसवला गेला. नागपुरकरांचा नर्मदा नदीवरील प्रदेश इंग्रजांनी ताब्यात घेतले. लॉर्ड हेस्टिंग नंतर लॉर्ड अम्हहर्स्टची कारकीर्द १८२३ - १८२८ झली. त्याच्या कारकिर्दीत पहिले ब्रम्ही युद्ध खेळले गेले. इंग्रज फौजांनी पराभव केला. यादेबुच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना अराकान व तेनासेरीम हे प्रांत दिले. व आपल्या फौजा आसामच्या प्रदेशातून परत घेतल्या.



लॉर्ड बेंटिक ते लॉर्ड हार्डिंग [१८२८ - १८४८]
* लॉर्ड विल्यम बेंटिक १८२८ - ३५  उदारमतवादी होता. हिंदी राज्याच्या कारभारात शक्यतो हस्तक्षेप करावयाचा नाही. असे त्याचे धोरण होते. तथापि अंतर्गत बंडाळी व अशांतता या कारणामुळे त्याला म्हैसूर राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. कुर्ग राज्य खालसा करावे लागले. त्याच्यानंतरच्या लॉर्ड ऑकलंड या गवर्नर जनरलच्या कारकिर्दीत १८३६ - ४२ पहिले अफगाण युद्ध घडवून आले.

* यानंतर लॉर्ड हार्डिंग हा गवर्नर जनरल म्हणून आला १८४४ - ४८ त्याच्या कारकिर्दीत पहिले इंग्रज - शीख युद्ध झाले. इंग्रजांचा विजय होऊन शिखांनी सतलजच्या दक्षिण तीरावरील प्रदेशाचा हक्क सोडून दिला व दीड कोटींची खंडणी कबूल केली.

लॉर्ड डलहौसीची कारकीर्द [१८४८ - १८५६]
* वेलस्लीनंतर इंग्रज सत्तेची मोठी वाढ लॉर्ड डलहौसी केली. डलहौसी कारकिर्दीत दुसरे इंग्रज - शीख युद्ध घडून आले. दोन मोठ्या लढाया होऊन शिखांचा पूर्ण पराभव झाला. या विजयानंतर डलहौसीने पंजाबमधील शिखांचे राज्य खालसा करून इंग्रजी राज्यात विलीन करून टाकले.

* तसेच दत्तक वारस नामंजूर या तत्वानुसार त्याने सातारा, नागपूर, झाशी, संबलपुर, जैतपूर, उदयपुर, इत्यादी राज्ये खालसा केली आणि इंग्रजी राज्यात विलीन केली. याशिवाय तैनाती फौजेची खर्चाची येणे बाकी वसूल करण्यासाठी निजामाकडून त्याने वऱ्हाड प्रांत घेतला. बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्याच्या दत्तक पुत्राची नानासाहेबाची पेन्शन जप्त करण्यात आली. कर्नाटकच्या नवाबाच्या मृत्यू त्याचे राज्य खालसा करण्यात आले.[ १८५३ ]. तंजावरच्या राज्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाची जहागीरीरही जप्त करण्यात आली. गैरकारभाराच्या नावाखाली अयोध्येच्या  नावाबाचे उरले सुरले राज्य खालसा केले.

* डलहौसीच्या धोरणाने हिंदुस्तानातील जास्तीत जास्त प्रदेश एकसंध अशा इंग्रजी आला. डलहौसी धोरणाने हिंदुस्तानातील धोरणाने अराजक कमी झाले. लोकांना स्वस्थ व शांतता हे इंग्रज राजवटीचे फायदे मिळाले, हे कबूल करावयास हवे. प्रदेश खालसा केल्याबरोबर तो आपली कार्यक्षम राज्ययंत्रणा त्या ठिकाणी उभा करी. त्याच्याच कारकिर्दीत रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे, हि आधुनिक दळणवळणची साधने हिंदुस्तानात सुरु करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.