ब्रिटीश सत्तेचा उदय

इंग्रजांच्या व्यापारी संस्कृतीचे स्वरूप
* इंग्रज लोक आपल्या देशात व्यापारी म्हणून आले व कालांतराने आपल्या देशाच्या राजकारणात प्रवेश करून ते राज्यकर्ते बनले.

इंग्रजांच्या व्यापारी संस्कृतीचे स्वरूप

* १५ - १६ व्या शतकाच्या सुमारास युरोपात आधुनिक युगाचा उदय झाला. बुरसटलेल्या विचारांचे जुने युग झपाट्याने बदलून बुद्धीनिष्ठ विचार करणारा वर्ग युरोपात उदयास आला. कला, साहित्य, विज्ञान, धर्म, व्यापार, राजकारण, अशा मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रात नवनवीन प्रयोग होऊ लागले. अशा प्रकारे युरोपातील नव्या युगाचे पंडित हे केवळ पुस्तकी पंडित नव्हते, तर ते संशोधक होते.

* इतर युरोपियन देशातील व्यापारी वर्ग अधिक प्रबळ होता. त्याने इंग्लंडच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. इंग्लंड मधील सरदार व धर्मगुरू यांच्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष राजावरही त्यांनी पार्लमेंटच्या साह्याने वर्चस्व निर्माण केलेले होते. पुढे पुढे हे वर्चस्व वाढत गेले व इंग्लंडच्या राजकारणाची सर्व सूत्रे या व्यापारी मंडळीच्या हाती गेली.

इंग्रजी सत्तेचा विकास

* पूर्वी हिंदुस्तानातील माल इराणचे आखात इटली या खुष्कीच्या मार्गे युरोपियन देशात पोहोचत असे. परिणामी हिंदुस्तानाकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध लावणे युरोपियन व्यापारांना व राज्यकर्त्यांना अत्यंत गरजेचे वाटू लागले. या प्रयत्नातून स १४९२ साली त्याला अमेरिका हे नवे खंड सापडले. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशात हिंदुस्तांनकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध काढण्यास यश आले. वास्को द गामा या  पोर्तुगीज खलाशाने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरात प्रवेश केला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली.
वास्को द गामा कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे हिंदी किनाऱ्यावरील पहिले पाऊल होय.

* अशाप्रकारे पूर्वेकडील देशांशी, विशेषता हिंदुस्तान आग्नेय आशियाई देश व चीन यांच्याशी होण्याऱ्या व्यापाराचे भव्य दालन युरोपियन व्यापाराचे खुले झाले. प्रारंभी पोर्तुगीज व्यापारीच आघाडीवर होते. त्यांनी व्यापारच नव्हे तर राज्यविस्तारावरही भर दिला. लंडन मधील काही धाडशी व्यापारांनी या वेळी जी व्यापारी कंपनी स्थापन केली ती इस्ट इंडिया कंपनी होय.

* सन १६१५ साली इंग्रज राजाचा वकील सर थॉमस रो याने जहागीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टनम, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इत्यादी अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारी उभ्या केल्या. पुढे सन १७१७ साली विल्यम हमील्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशाह फरुख सियर याला आजारातून बरे केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.