मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

प्रकाशचे संक्रमण -

प्रकाशचे संक्रमण -
प्रकाशाचे संक्रमण एका सरळरेषेत असते. याला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला आणि तिघेही एका सरळ रेषेत आले. कि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते अशा वेळी सूर्यग्रहण झाले असे म्हणतात.
सूर्यग्रहण फक्त अमावशेच्या वेळी दिसते. ते आंशिक किंवा पूर्ण असते.

चंद्रग्रहण -
सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली तर आणि तिघेही एका सरळरेषेत आले कि पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचा काही भाग झाकला जाते. त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात. चंद्रग्रहन पौर्णिमेलाच असते. तेव्हा ते आंशिक व पूर्ण असते.

उष्णतेचे परिणाम- 
* ज्या तापमानावर स्थायुचे द्रवात अवस्थांतर त्यास त्या पदार्थाचा द्रवनांक म्हणतात.
* ज्या तापमानावर द्रवाचे वायूत अवस्थांतर होते त्यास त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.
पदार्थ           द्रवनांक            उत्कलनांक
पाणी               ०'                    १००'
लोह             १५३५'             २७५०'
तांबे             १०८२'             २३१०'
शिसे             ३२७'               १७४०'
पारा             -३९'                   ३५७'

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.