रविवार, ३ जुलै, २०१६

पृथ्वीवरील वातावरण, पर्जन्य, तापमान, हवामान

पृथ्वीवरील वातावरण, पर्जन्य, तापमान, हवामान 

वातावरण

* वातावरणाचे घटक - वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे व त्याचे शेकडा प्रमाण - ७८.०८४ एवढे आहे. त्यानंतर ऑक्सिजनचे प्रमाण असून त्याचे शेकडा प्रमाण २०.९४६ एवढे असून, अरगॉनचे प्रमाण ०.९३४ आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्सीडचे प्रमाण असून त्याचे शेकडा प्रमाण ०.०३३ आहे.

* वातावरणाचे थर - वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.

वातावरणाचे मुख्य थर 

* तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.

* तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.

* स्थितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.

* स्थितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.

* मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.

* मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.

* दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.

* आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.

* बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

जग : पर्जन्य 

* जास्त पर्जन्य [ २०० सेमीपेक्षा जास्त ] - विषुववृत्तीय प्रदेश, आग्नेय आशिया, भारताचा काही भाग, द चीन मान्सून पावसाचे प्रदेश.

* माध्यम पर्जन्य [ १०० ते २०० सेमी ] - ऑस्ट्रेलिया, द आफ्रिका,  युरोप, मेक्सिको, अमेरिका पूर्व किनारपट्टी.

* कमी पर्जन्य - [ २५ ते १०० सेमी ] - भारत, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका यांचा काही भाग.

* अतिकमी पर्जन्य [ २५ सेमी पेक्षा कमी ] - दक्षिण अमेरिकेतील अटाकामा, आफ्रिकेतील कलाहारी व सहारा वाळवंटे, अरेबिया व मंगोलियाची वाळवंटे, भारतातील थरचे वाळवंट.

* जगातील सार्वधिक पर्जन्य ठिकाण मौसीनराम भारतातील आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४३ सेमी आहे.

* जगातील सर्वात कमी पर्जन्यमान अटाकामा वाळवंट चिली, या ठिकाणी होते, वार्षिक सरासरी पर्जन्य ०.२ सेमी पेक्षा कमी.

जग : तापमान 

* तापमान ठरवणारे घटक - सूर्यकिरणांचा भूपृष्ठांशी होणारा कोण, दिनमान, जमिनीचा उतार, समुद्र सपाटीपासून उंची, जमिनीचे स्वरूप, वारे ढग इत्यादी आहेत.

* अतितापमानाची शहरे - जाकोदाबाद पाकिस्तान, डालोल इथियोपिया, अझिझिया लिबिया.

* अतिशय कमी तापमानाचे जगातील शहर - वरखोयान्स्क रशिया

* चक्रीवादळ - वातावरणात बऱ्याच उंचीवरील कमी दाबाच्या क्षेत्रास चक्रीवादळ निर्माण होते. आयला, फयान, लैला, सिन्द्र, रश्मी, नर्गिस, बंडू, वोर्ड, निशा, बिजली, फेट, गिरी, जल, नीलम.



 























2 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.