
* उत्तरप्रदेशमधील समाजवादी पेंशन योजना यासाठी विद्या बालन यांनी सदिच्छादूत म्हणून विद्या बालन या अभिनेत्रीची निवड केली आहे.
* उत्तरप्रदेश सरकारने नागरिक आणि सरकार यांच्यात संवाद साधता यावा म्हणून स्मार्टफोन योजना लागू करण्याची योजना केली आहे.
* मिहान प्रकल्पातील पतंजली फूड अँड हर्बल पार्क २३० एकरात उभारण्यात येणार आहे. त्यात १६०० कोटीची गुंतवणूक करण्यात येईल या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या वस्तूचे देशात व विदेशात निर्यात नागपूर येथून केली जाणार आहे.
* जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याचा पराभव करीत स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंग याला २०१६ चे यूएस ओपनचा किताब घेतला.
* कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे कौशल्य विकासाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबविणाऱ्या दहा राज्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक ऐकवर आहे.
* आयसीसी टी-२० जागतिक क्रमवारीत विराट कोहलीने प्रथम स्थान मिळविले असून ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंच दुसऱ्या स्थानावर आहे. तर गोलंदाजात वेस्टइंडिजच्या सॅम्युअल्स बद्री प्रथम स्थानावर आहे. आफ्रिकेचा इम्रान ताहीर दुसऱ्या, भारताचा बुमराह तिसऱ्या व आर अश्विन चौथ्या स्थानावर आहे.
* देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्द्ता व त्यांच्या विकासासाठी केंद्रीय उच्चशिक्षण वित्तसंस्थेची [हेफा] या संस्थेची स्थापना करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. उच्च शिक्षणाची गंगा गावोगावी पोहोचविण्यासाठी हेफा या योजनेची स्थापना करण्यात आली.
* नासाच्या गोडार्ड इन्स्टिटयूट ऑफ स्पेस स्टडीज या संस्थेने वैश्विक तापमानाचे विश्लेषण करून गेल्या १३६ वर्षांपासून २०१६ चा ऑगस्ट महिना सर्वाधिक उष्ण असल्याचे समोर आले आहे.
* जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये खुला करण्यात आला असून या पुलाचे नाव [ बेईपयजिंग ] असून या पुलाची उंची १८८४ फूट आहे.
* केंद्र सरकारने देशात २७ हजार लांबीच्या ४४ महामार्गाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
* रिओ पॅरालम्पिक स्पर्धेत भारताच्या मॅरियप्पन थंगावेलु हीने उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी घेऊन सुवर्णपदक मिळविले. भारताच्या वरून भाटीने याच प्रकारात १.८६ मीटर उडी घेऊन कास्य पदक मिळविले. गोळाफेक मध्ये दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरी करत रौप्य्पदक मिळविले. अथेन्स येथे ६२.१५ मीटर अंतरावर भाला फेकून देवेंद्रने विश्वविक्रम साकारला होता आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. रियोमधील या स्पर्धेत आता दोन सुवर्ण, एक रौप्य, एक कास्य असे चार पदके जमा झाली आहेत.
* जगातील पहिली चालकरहित मोटार बस फ्रांसमध्ये सुरु - २०१६, आता जगात चालकरहित गाड्यांचे वारे वाहत असताना फ्रान्समध्ये ही बस सुरु करण्यात आली आहे. या बसमध्ये दोन इलेक्ट्रिक शटल असून त्यांच्या मदतीने दहा मिनिटाचा मार्ग प्रवासी पार करू शकतील. ही बस इलेक्ट्रिक असून यामध्ये १५ प्रवासी बसू शकतात. या बसमध्ये लिडार रडार तंत्रज्ञान वापरले असून त्यात अपघात टाळण्यासाठी गती संवेदकाचा वापर केलेला आहे. लीडार हे लाईट डिटेक्शन अँड रेजिंग या शब्दाचे लघुरूप असून त्याचा उपयोग रडारमध्ये केला जातो.
* टेलिव्हिजन जगातील सर्वात जास्त फीस घेणाऱ्यांच्या यादीत प्रियंकाला आठवे स्थान मिळाले आहे, हा विक्रम नोंदवणारी प्रियांका पहिलीच भारतीय ठरणार आहे. फोर्ब्ज कडून जाहीर करण्यात आलेल्या जगात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्री मध्ये प्रियांका आठव्या स्थानावर आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा