
* जागतिक बँकेच्या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीतदेखील जगभरातील दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येत १०% घट झाली आहे.
* बँकेच्या नुसार २०१३ साली तब्बल ७६.७ कोटी लोकांचे उत्पन्न १.९० डॉलर एवढे होते. २०१२ मध्ये हा आकडा ८८.१ एवढा होता.
* विशेषतः आशियातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतदेखील बिकट परिस्थितीदेखील दारिद्रय नष्ट करीत सर्व देशांची सुरु असलेली वाटचाल उल्लेखनीय आहे. असे मत जागतिक बँक अध्यक्ष जिम याँग किम यांनी सांगितले.
* त्यामुळे २०३० पर्यंत दारिद्र्य नष्ट करण्याचे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट जवळ आले आहे असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
* गेल्या २५ वर्षांमध्ये लोकांच्या उत्पन्नाची विषमता वाढली आहे. मात्र ४० देशामध्ये विषमता कमी झाल्याने नव्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. यामध्ये ब्राझील, पेरू, मली, आणि कंबोडियासारख्या देशांचा समावेश आहे.
* दारिद्रयरेषेखालील लोकसंख्येचा आकडा २०१५ साली पहिल्यांदाच जागतिक लोकसंख्येच्या १० टक्क्यापेक्षा खाली जाईल असा अंदाज जागतिक बँकेकडून वर्तविण्यात आला आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा