मंगळवार, १० एप्रिल, २०१८

देशात रेल्वे आणि बँकेत विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार - १० एप्रिल २०१८

देशात रेल्वे आणि बँकेत विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार - १० एप्रिल २०१८

* सरकारी मालकीच्या बँका व रेल्वेविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचा अहवाल केंद्रीय दक्षता आयोगाच्या सीव्हीसी भ्रष्टाचारप्रतिबंधक विभागाने प्रकाशित केला आहे.

* मात्र सीव्हीसीकडे येणाऱ्या भ्रषाचाराच्या खटल्यामध्ये २०१६ च्या तुलनेत ५२% घट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले. '

* देशातील भ्रष्टचारसंबंधी २०१७ चा वार्षिक अहवाल सीव्हीसीकडून संसदेत सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात सीव्हीसीकडे भ्रष्टाचाराच्या २३,६०९ तक्रारी प्राप्त झाल्या असून २०११ पासूनची आकडेवारी पाहता भ्रष्टाचाऱ्याचा तक्रारी घातल्याचे चित्र आहे.

* २०१६ मध्ये ४९,८४७ तक्रारी सीव्हीसीला मिळाल्या होत्या. प्राप्त तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी या खोट्या माहितीवर आधारित असतात.

* राज्य शासनाच्या कर्मचारी व अधिकाऱ्याविरोधातील तक्रारीसह ज्या संस्था सीव्हीसीच्या अधिकार क्षेत्रात नाहीत, अशा अधिकाऱ्याविरोधातही तक्रारी प्राप्त होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

* देशातील विभागनिहाय तक्रारी - रेल्वे १२०८९, बँक ८०१८, प्रत्यक्ष कर विभाग २७३०, पेट्रोलियम २७३०, उत्पादन शुल्क ११९४, खाण मंत्रालय ९३२, आरोग्य मंत्रालय ७८०. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.