सोमवार, ९ एप्रिल, २०१८

जितू रॉयला १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक - १० एप्रिल २०१८

जितू रॉयला १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक - १० एप्रिल २०१८

* भारतीय पथकाकडून वेटलिफ्टिंग आणि नेमबाजीतील अपेक्षित यशाने सुवर्णधडाका सुरु असतानाच टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमधील सांघिक यशाने भारतीय क्रीडा प्रगतीचे आश्वासक चित्र आहे. 

* या स्पर्धेत भारताने १० सुवर्णपदक जिंकून पदक क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहेत. पाचव्या दिवशी पर्यंत ऑस्ट्रेलियाने गोल्ड ३९, सिल्वर ३३, ब्राँझ ३४, एकूण १०६, इंग्लंड गोल्ड २२, सिल्वर २५, ब्राँझ १६ एकूण ६३. भारत गोल्ड १०, सिल्वर ४, ब्रॉन्झ ५ एकूण १९ पदके. 

* भारतीय महिला नेमबाजांनी या यशाचा आनंद द्विगुणित केला. महिलांच्या १० मीटर एअर रायफल गटात मेहूली घोषने रौप्य तर अपूर्वीने कांस्यपदक पटकाविले आहे. 

* भारतीय वेटलिफ्टर्सनी आपली नेत्रदीपक कामगिरी सुरूच ठेवली आहे. भारताच्या प्रदीप सिंह याने आज वेटलिफ्टिंगच्या १०५ किलोग्रॅम वजनी गटात रौप्यपदक पटकाविले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.