पाटबंधारे विकास महामंडळे
[महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ]
* कृष्णा नदी पाणी निवाड्यानुसार कृष्णा नदीचे ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाट्यास आले होते. हा निवडा मे २००० पर्यंत आंध्रप्रदेश, कर्नाटक, व महाराष्ट्र या राज्यावर बंधनकारक होता.
* त्यामुळे आपल्या वाट्यास आलेले पाणी वापरण्यावर राज्याने दरम्यानच्या काळात भर दिला. स्वाभाविकच कृष्णा खोऱ्यातील चालू प्रकल्प पूर्ण करण्याचे व नवीन प्रकल्प त्वरेने हाती घेण्याचे धोरण राज्याने अंगिकारले.
* या धोरणाच्या परिपूर्ततेसाठी जानेवारी १९९६ मध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली गेली. या महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे. कृष्णा खोऱ्यातील १९ मोठे ३३ मध्यम व २६५ लघुपाटबंधारे प्रकल्प या महामंडळाच्या कार्यक्षेत्रात येतात.
* कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी केंद्राने सन २००४ मध्ये न्या. ब्रिजेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कृष्णाजल तंटा न्यायधिकारण नियुक्त केले.
* या न्यायाधिकाराने आपला अंतिम निवाडा २९ नोव्हेंबर २०१३ रोजी जाहीर केला. त्याअन्वये महाराष्ट्राच्या वाट्याला ६६६ टीएमसी इतके पाणी आले आहे. हा निवाडा सन २०५० पर्यंत वैध असून संबंधित राज्यावर बंधनकारक आहे.
[विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ]
* विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने १ एप्रिल १९९७ रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
* या महामंडळाच्या माध्यमातून विदर्भातील २४ मोठे. ५१ मध्यम व १९१ लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामास गती देण्यात आली आहे.
[कोकण पाटबंधारे विकास महामंडळ]
* कोकण विभागातील सिंचनक्षेत्र अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने व या विभागातील १ मोठा, ४ मध्यम, व ३३ लघुपाटबंधारे प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी डिसेंबर १९९७ मध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
* सध्या या महामंडळाच्या कक्षेत ४ मोठे, ११ मध्यम, व ८१ लघु पाटबंधारे प्रकल्प येतात.
[तापी पाटबंधारे विकास महामंडळ]
* याच दरम्यान उत्तर प्रदेशातील सिंचनक्षेत्र अनुशेष भरून काढण्याच्या कामास गती देण्यासाठी डिसेंबर १९९७ मध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली गेली.
* या महामंडळाच्या माध्यमातून धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील १० मोठे, २५ मध्यम, व ९८ लघुपाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे.
[गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ]
* ऑगस्ट १९९८ मध्ये गोदावरी-मराठवाडा सिंचन महामंडळाची स्थापना करण्यात आली. मराठवाडा विभागातील १६ मोठ्या १६ मध्यम व २०७ लघु पाटबंधारे प्रकल्पांचे काम या महामंडळाच्या कार्यकक्षेत येत असून ते जलद गतीने पुरे केले जाणे अपेक्षित आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा