खरीप कडधान्ये [तूर, मूग, उडीद]
* पेरणी व मशागत - कडधान्ये मानवी आहारात तर महत्वाची आहेत, शिवाय ही पिके हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करतात. यांचा जमिनीवर पडणारा पाला जमिनीची सुपीकता वाढविण्यास व जमिनीची धूप उपयुक्त ठरतो.
* यासाठीच या पिकांना बेवड चांगला आहे. असे शेतकरी म्हणतात. महाराष्ट्रात खरीप हंगामातील तूर, मूग, उडीद, ही प्रमुख कडधान्ये होत.
* भारतातील तूर व मूग या पिकाखालील एकूण २४ ते २५ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परंतु एकूण उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा २२ ते २३ टक्के इतकाच आहे.
* उडीद पिखाखाली भारतातील एकूण क्षेत्राच्या १७ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. या पिकाच्या उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा एकूण १५ टक्क्याच्या जवळपास आहे.
* नवीन तंत्राचे अवलंबन करून या पिकांचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.
* हवामान - या पिकांना समशीतोष्ण हवामान योग्य ठरते. जास्त थंड मानवतनाही.
* जमीन - विविध प्रकारच्या जमिनीत ही पिके घेता येतात. तथापि, मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी सुयोग्य ठरते. क्षारयुक्त व चोपण जमिनीत उत्पन्न कमी येते.
* पूर्वमशागत - एक खोल नांगरट व नंतर कुळवाच्या तीन चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करणे आवश्यक असते.
* पेरणी - मूग व उडीद या पिकांची पेरणी मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर आणि जमिनीत पुरेशी ओल आल्यावर करतात. जूनचा दुसरा पंधरवडा पेरणीसाठी योग्य ठरतो. तूर पिकाची पेरणी चांगला पाऊस झाल्यावर जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात करतात. पेरणीस याहून उशीर झाल्यास उत्पन्नात घट येते.
* सुधारित जाती - तुरीच्या हळव्या, लवकर येणाऱ्या, जातीत आयसीपीएल ८७ व टीएटी १० या १२० १२५ दिवसात तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरव्या प्रकारात बीडीएन १ व २ तसेच, टी विशाखा, १ या जाती असून त्या १५५ ते १६५ दिवसात तयार होतात. सी ११, १४८ व आयसीपी ८७११९ या जाती तुरीच्या गरव्या प्रकारात मोडतात. यांचा तयार होण्याचा कालावधी १७० १९० दिवसाचा असतो.
* पीकसंरक्षण - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, वरील तिन्ही पिकावर या किडी दिसून येतात. यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसात एक लिटर मॅलेथीऑन ५० टक्के प्रवाही ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करतात. शेंगमाशी, घाटेअळी, पिसारी पतंग कळ्या लागण्यापासून शेंग पकव होईपर्यत या किडीचा उपद्रव होतो.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा