३] बाजरी
* जमीन - बाजरीसाठी थोड्या कमी खोलीची किंवा मध्यम खोलीची जमीन चालते.
* एक नांगरट व ३ ते ४ कुळवाच्या पाळ्या देतात. तसेच हेक्टरी १०-१२ गाड्या शेणखत जमिनीस मिसळतात.
* पेरणी - जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर १५ दिवसांच्या आत पेरणी केली जाते. १५ जून ते १५ जुलै या काळात पेरणी केल्यास उत्पन्न चांगले येते. या पिकाची ४५ बाय १५ सेमी अंतरावर करतात.
* सुधारित जाती - संकरित बाजरीच्या श्रद्धा, बीके ५६०, एमएच १४३, एमएच १६९, एमएच १७९ या जाती आहेत. सुधारित वाणात WCC ७५, ICTP ८२०३, ICMV ८७९०१ इत्यादीचा समावेश असतो.
* रासायनिक खते - अवर्षणप्रवण भागात हेक्टरी ४० ते ४५ किलो नत्र व २० ते २५ किलो स्फुरद ही खते दिली जातात. मध्यम जमीन व बरा पाऊस पडणाऱ्या प्रदेशात किंवा ओलिताची सोय असलेल्या जमिनीत हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद ही मात्रा योग्य ठरते. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी दिले जाते. राहिलेले नत्र २५ ते ३० दिवसांनी जमिनीत ओलावा असताना देतात.
* रोग - भुंगे किंवा बाळी - या किडीचा उपद्रव बाजरी पीक फुलोऱ्यात असताना होतो. यावर उपाय म्हणून बीएचसी १०% पावडर हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळतात.
* कोरडवाहू प्रदेशात - या तंत्रात पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविला जातो. यात बाजरीची पेरणी [सरी वरंबा] पद्धतीने केली जाते.
* उत्पन्न - श्रद्धा या वाणाचे हेक्टरी उत्पन्न २६.५ क्विंटल व सरमाड हेक्टरी ५.३ टन मिळते. एम एच १७९ या वाणाचे उत्पन्न २२.७ क्विंटल व सरमाड ५.५ टन मिळते.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा