२०३० पर्यंत जगातील ६४% संपत्ती १% श्रीमंतांकडे असणार - ९ एप्रिल २०१८
* हाऊस ऑफ कॉमन्स ग्रंथालयाने जारी केलेल्या माहितीनुसार उत्पन्नातील विषमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००८ च्या जागतिक मंदीनंतर सुरु झालेल्या आर्थिक व्यवहारातील अनियमितता अशाच पद्धतीने सुरु राहिल्यास या आर्थिक विषमतेत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
* आकडेवारीनुसार २०३० पर्यंत एक टक्का श्रीमंतांकडे जगातील ६४% संपत्ती एकवटलेली असेल. ही संपत्ती तब्बल २१६ ट्रिलियन पौंडहुन अधिक असेल. [१ ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी] भारतीय रुपयात ही रक्कम १९७५२ लाख कोटी रुपये रुपये होते.
* एक टक्का श्रीमंतांमध्येही यापूर्वीपेक्षा झपाट्याने वाढ होत आहे. हे प्रमाण वर्षाला सरासरी ६ टक्के इतके आहे. संपत्तीवरील उच्च बचत दर आणि मालमत्तेच्या साठ्यामुळे असमानता वाढत चालल्याचे तज्ञानी म्हटले आहे.
* श्रीमंतांच्या हातामध्ये एकवटत चाललेल्या आर्थिक सामर्थ्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
* ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये ३४ टक्के लोकांच्या मते पुढच्या १२ वर्षात अतिश्रीमंत लोक सर्वात जास्त संपत्तीवर नियंत्रण मिळवतील.
* तर २८% लोकांना वाटते की, ही संपत्ती सरकारकडे असेल. उत्पन्नातील विषमतेमुळे भ्रष्टाचार वाढण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
* कारण आगामी काळात एक टक्का श्रीमंत वर्गाचा राजकारण्यांवर वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. वाढत चाललेल्या असमानतेला रोखण्यासाठी सर्व खासदार, व्यवसायिक नेते, शिक्षणतज्ञ, व्यापारी गटांनी एकत्र येण्याची गरज लेबर पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री लियाम बायरन यांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा