मोबाईल उत्पादनात भारत जगात २ ऱ्या क्रमांकावर - १ एप्रिल २०१८
* सर्वाधिक मोबाईल उत्पादनात देशाच्या यादीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताने स्थान मिळवले आहे. याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनामला भारताने मागे टाकले. असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने दावा केला आहे.
* आयसीएचे अध्यक्ष पंकज महेंद्र व दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी याची माहिती दिली. आयसीएने मोबाईल उत्पादनासंदर्भात चीन आणि व्हिएतनाममधील संस्थांचा हवाला दिला आहे.
* आयसीएच्या मोबाईल उतपादनासंदर्भातील चीन आणि व्हिएतनाममधील संस्थांचा हवाला दिला आहे. आयसीएच्या आकडेवारीनुसार, भारतात २०१४ साली मोबाईल फोनचे ३० लाख उत्पादन झाले. तर २०१७ साली १.१ कोटी युनिट उत्पादन झाले.
* २०१९ पर्यंत आता मेक इन इंडिया अंतर्गत ५० कोटी युनिटच ध्येय ठेवण्यात आले आहे. म्हणजेच ४६ अब्ज डॉलर एवढी उलाढाल मोबाईल उत्पादनात होईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा