मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

राज्यात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना - २४ ऑक्टोबर २०१८

राज्यात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना - २४ ऑक्टोबर २०१८

* पंतप्रधान घरकुल योजनेतील घरकुलाच्या बांधकामांना गती देण्यासाठी निश्चित केलेले उद्दिष्ट ठरविलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी मोठ्या वसाहतीचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

* यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ Mahahousing स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

* या महामंडळाअंतर्गत २०२२ पर्यंत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी ५ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक प्रकल्पात किमान ५ हजार घरकुलांचा समावेश होणार आहे. 

* पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत राज्य सरकारने २०२२ पर्यंत १९ लाख ४० हजार घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील ३८३ शहरामध्ये योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. 

* तसेच या विभागाअंतर्गत गृहनिर्माण विभाग, म्हाडा, नगर परिषद संचालनालय आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. 

* सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणांतर्गत घरांची उभारणी करण्यात येत आहे. मात्र घरकुलाच्या निर्मितीस वेग देऊन निश्चित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडाव्यतिरिक्त पूर्णवेळ कार्यरत राहू शकणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता होती. 

* त्यानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.