मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर - २४ ऑक्टोबर २०१८

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर - २४ ऑक्टोबर २०१८

* पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. '२०१८ सेऊल पीस प्राईस' असे या पुरस्काराचे नाव असून द सेऊल पीस प्राईस कमिटीने याची घोषणा केली आहे.  

* पंतप्रधान मोदी यांची विदेशात आणि स्वदेशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न जागतिक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे द सेऊल पीस प्राईस कमिटीने म्हटले आहे. 

* भ्रष्टाचार विरोधी पावले उचलल्याने आणि समाजाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांद्वारे मोदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत. 

* याचीही मोदींच्या पुरस्कार निवडीसाठी नोंद घेण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.  दरम्यान नुकतेच २६ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमधील हा पर्यावरण विषयक पुरस्कार जाहीर झाला आहे. 

* पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांना विभागून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.