
* आता लवकरच घरातील टिव्हीवर सुमारे १०० सॅन्डर्ड डेफिनेशन [एसडी] वाहिन्या अवघ्या १३० रुपयांमध्ये उपलब्द होऊ शकणार आहेत.
* भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने ट्राय आपल्या दूरसंचार [ प्रसारण आणि केबल सेवा ] दरासंबंधी आदेशात ग्राहकांना पिकअप अँड पे बेसिस वर वाहिन्या देऊ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
* सध्या प्रचलित असलेल्या पॅक पद्धतीत काही ठराविक वाहिन्यांचा सेट असतो. ब्रॉडकास्टरला सरकारने अधिसूचित केलेल्या वाहिन्या ग्राहकांना देणे बंधनकारक असणार आहेत. यामध्ये एचडी वाहिन्यांचा सुद्धा समावेश आहे.
* या आदेशाच्या नुसार ग्राहकांना दोन एसडी चॅनेल्सऐवजी एक एचडी चॅनल मिळवत इतर प्रमुख चॅनल्ससाठी पैसे भरावे लागतील. असे या आदेशाचे नमूद केलेले आहे.
* याशिवाय प्रत्येक ब्रॉडकास्टरला वाहिन्यांची पे अँड फ्री अशा श्रेणीमध्ये विभागणी करावी लागणार आहे. हा आदेश १ एप्रिल २०१७ पासून लागू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा