
* विज्ञानाचा प्रगतीचा वापर करून वनस्पतीच्या आहारासाठी पूरक वनस्पतीची लागवड करून मंगळावर बगीचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यिकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करत आहेत.
* मंगळ बगीचाचे सदृशीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटयूट यांनी केले आहे. त्यात मंगळावर वनस्पतीची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.
* मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळवारील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत. त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.
* विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतीच्या आहारासाठी पूरक वनस्पतीची लागवड केली जाऊ शकते. यात अवकाशवीर हे अवकाशात विविध वनस्पतीची लागवड करू शकतील. असे स्पेस डॉट कॉम संशोधनाबाबत माहिती देताना सांगितले आहे.
* मंगळाच्या बगीचाच्या सादृश्यिकरणाबाबत हवाई बेटावरील माती वापरण्यात आली कारण ती मंगळासारखी आहे.
* यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करावी लागतील याचा अंदाज घेण्यात आला आहे. लेट्युसची लागवड कुठल्याही पोषकांचे मिश्रण न करता होऊ शकते असे दिसून आले आहे. पण या मातिती लेट्युसची मुळे कमकुवत ठरली व अंकुरण दर कमी दिसून आला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा