
* फोर्ब्स मासिकाने ' द रिचेस्ट पीपल इन अमेरिका ' अहवाल सादर केला असून त्यात सिम्फनी टेक्नॉलॉजिचे संस्थापक रोमेश वाधवानी, सिंटेल भारत चे नीरजा देसाई, एअरलाईन्स कंपनीचे मालक राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर, सिलिकॉन व्हॅलीतील गुंतणूकदार कविर्तक राम श्रीराम यांचा यादीत समावेश आहे
. * यादीतील एकूण ४०० जणांमध्ये मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स लागोपाठ २३ व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने लसीकरण व इतर सामाजिक कामात मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.
* एकूण ४०० जणांच्या यादीत बिल गेट्स वयाने ६० वर्षाचे असून त्यांची एकूण संपत्ती ८१ अब्ज डॉलर असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
* या यादीत देसाई यांचा क्रमांक २७४ संपत्ती २.५ अब्ज डॉलर, गंगवाल यांचा क्रमांक ३२१ संपत्ती २.२ अब्ज डॉलर, जॉन कपूर ३२५ संपत्ती २.१ अब्ज डॉलर, राम श्रीराम ३६१ संपत्ती १.९ अब्ज डॉलर, आहेत.
* या यादीत आयआयटी मुंबईचे रोमेश वाधवानी ६९ व्या क्रमांकावर आहेत त्यांची संपत्ती ३ अब्ज डॉलर एवढी आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा