
* भारतीय हरित इमारत परिषद - [IBGC] यांच्या एक कार्यक्रमात देशात सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्र राज्याचा देशातील हरित इमारतीत सध्या सर्वाधिक २४% वाटा आहे.
* देशभरातील ३,८०० च्या तुलनेत महाराष्ट्रातील तब्बल ७८० बांधकाम प्रकल्पांनी हरित प्रकल्प मिळविले आहे.
* पर्यावरण आणि हवामान बदलाच्या दृष्टीने किमान हानिकारक ठरेल अशा जागतिक हरित इमारतीच्या चळवळीत अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
* राज्यातील ७८० बांधकाम इमारतींपैकी तब्बल ६४% इमारती मुंबईत आहेत. नवीन हरित इमारतीत हवा खेळती राहते, विजेची व पाण्याची बचत, नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर होतो. त्यामुळे याचा भरपूर फायदा होतो.
* या परिषदेनुसार इमारतीतील सांडपाण्याचा पूणर्वापार, संपूर्ण अक्षय ऊर्जेचा वापर अशा तर्हेने नेट झिरो ताण २०२२ पर्यंत १०,००० चौरस किमी हरित बांधकामाचे लक्ष निर्धारित केले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा