
* भारतात कोणालाही रक्कम अदा करण्यासाठी आता रोखीचे व्यवहार, धनादेश, बँक ड्राफ्ट इत्यादीसाठी विनिमय साधनांचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही. लवकरच त्यांची जागा यूपीआय [ UPI - यूनिफाईड पेमेंट इंटरफेस ] ही नवी विनिमय पद्धत सुरु होणार आहे.
* युपीआय ही आपल्या बँक खात्यातून दुसऱ्याच्या बँक खात्यात रक्कम अदा करण्याची सेवा आहे की, ज्याच्या खात्यात रक्कम अदा करायची आहे त्याच्या बँक खात्याचा क्रमांक देण्याची गरज नाही.
* आपल्या स्मार्टफोन द्वारे त्याच्या कोणत्याही बँकेचा व्हर्चुअल ऍड्रेस, ईमेल अथवा बँकेत रजिस्टर केलेला त्याचा मोबाईल क्रमांक दिल्यास रक्कम जमा करता येईल.
* युपीआयमुळे कोणालाही रक्कम अदा करणे यापुढे सोपे जाणार
आहे. मार्च २०१७ पर्यंत देशातल्या किमान ५० बँका युपीआय सेवा सुरु करणार आहेत.
* युपीआय हा आर्थिक विनिमयाचा असा आधुनिक प्रयोग आहे. जो पेमेंट रिसीट तत्वावर काम करतो. ही सुविधा २४ तास सुरु राहील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा