नवाज शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात - १६ एप्रिल २०१८
* पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे.
* पाक राज्यघटनेच्या कलम ६२ एफ अंतर्गत दोषी ठरलेला लोकप्रतिनिधी किंवा सरासरी कर्मचाऱ्यावर आजीवन बंदी घातली जाईल.
* गेल्या वर्षी पनामा पेपर्स प्रकरणी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने नवाझ शरीफ यांना याच कलमान्वये शरीफ यांना दोषी ठरवत पंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते.
* त्यामुळेच न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता शरीफ यांना यापुढे कधीच सार्वजनिक पद स्वीकारता येणार नाहीत. याआधी त्यांना राजकीय पक्षांच्या अध्यक्षपदीही राहता येणार नाही. असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा