बलात्कारप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा - २५ एप्रिल २०१८
* अध्यात्माचा बाजार मांडत स्वतःच्या आश्रमामध्येच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूरमधील विशेष एससी/एसटी न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा आणि एक लाख रुपयाचा दंड ठोठावला.
* विशेष न्यायाधीश मधुसूधन शर्मा यांनी शिक्षा सुनावतच आसारामला रडू कोसळले. न्यायालयाने आसारामचे अन्य दोन सहकारी शिल्पी आणि शरद यांनाही दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
* राजस्थानमधील आश्रमामध्ये एका सोळा वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा ठपका आसारामवर ठेवला आहे. ती मुलगी आश्रममध्ये विद्यार्थिनी म्हणून राहत होती.
* आसारामवर पॉस्को आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
* या खटल्याची जोधपूर केंद्रीय कारागृहामध्ये एक विशेष कोर्टरूम तयार करून सुनावणी करण्यात आली. राजस्थान उच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार सत्र न्यायालयाने आज आसारामचा निवाडा केला.
* देशातील इंदिरा गांधी यांचे मारेकरी, अजमल कसाब, आणि डेरा सच्चा सौदा चा प्रमुख गुरमीत रामरहिम सिंग यांच्यानंतर हा चौथा हायप्रोफाईल खटला ठरला.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा