तानिया सन्याल भारतीय महिला फायर फायटर - २४ एप्रिल २०१८
* भारतीय विमान क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व असलेल्या अखेरच्या क्षेत्रातही एका महिलेने आता प्रवेश केला आहे. एअरपोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडियाने एएआय पहिल्यांदाच एका महिला फायर फायटरची नियुक्ती केली आहे.
* तानिया सन्याल असे या पहिल्या महिला फायर फायटरचे नाव आहे. ती मूळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रुजू होईल.
* तानियाने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला एएआयच्या पूर्व क्षेत्रातील विमानतळासाठी नियुक्त करण्यात येणार आहे.
* यामध्ये कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर, रायपूर, गया, आणि रांचीचा समावेश आहे. कोलकता प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यापैकी कोणत्याही का विमानतळावर तिची नियुक्ती केली जाईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा