व्हॉट्सअँप युजर्ससाठी किमान १६ वर्षे वयाची अट - २६ एप्रिल २०१८
* फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेलेले प्रकरण चांगलेच गाजत असताना आघाडीचे मेसेजिंग अँप व्हॉट्सअँप ने वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
* फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअँप कंपनीने आता १६ वर्षाखालील मुलावर खाते उघडण्यास बंदी घातली आहे. हा नवीन नियम मे महिन्यापासून फक्त युरोपियन संघ अर्थात ईयूतील देशासाठी लागू होईल.
* काही दिवसांनी हे नियम भारत व इतर देशांना लागू होतील. आजघडीला जगभरात व्हॉट्सअँप चालविण्यासाठी १३ वर्षाची वयोमर्यादा लागू होईल.
* परंतु २५ मेपासून युरोपियन संघामध्ये नवीन माहिती गोपनीय नियम लागू केले जातील. या नियमांबरोबरच व्हॉट्सअँप चालविण्याची व्हॉट्सअँप चालविण्याची वयोमर्यादा १६ इतकी करण्यात आली.
* नवीन नियम लागू होताच वापरकर्त्यांनी वापरकर्त्यांची आपल्या वयाची खात्री करून घ्यावी, असे कंपनीने सांगितले आहे.
* जनरल डेटा संरक्षण नियम अर्थात जीडीपीआर मुळे लोकांना आपल्या वैयक्तिक माहितीवर अधिक नियंत्रण मिळेल. त्यामुळे कंपन्या या माहितीचा वापर कशा पद्धतीने करतात. हे समजून घेण्यास लोकांना मदत होणार आहे.
* इतकेच नाही, तर वापरकर्त्यांना आपली वैयक्तिक माहिती पूर्णपणे मिटविता येईल. सोबतच वापरकर्त्यांना कंपनीकडे असलेल्या आपल्या माहितीची एक प्रतही डाउनलोड करता येईल.
* नवीन नियमाची अंमलबजावणी फक्त युरोपियन संघातील देशामध्ये केली जाणार आहे. तर उर्वरित जगासाठी व्हॉट्सअँप चालविण्याची वयोमर्यादा १३ इतकी ठेवण्यात आली आहे.
* उल्लेखनीय म्हणजे फेसबुकच्या इंस्टाग्राम सेवेमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांना डेटा डाउनलोड ची सुविधा दिली जाणार आहे.
* विशेष म्हणजे स्नॅपचॅट, युट्युब, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, आणि ट्विटर यासारख्या आघाडीच्या सोशल माध्यमावरही १३ वर्षापर्यंत निर्बंध लावण्यात आलेले आहेत.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा