सूर्यफूल
* पेरणी व मशागत - खाद्यतेलाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाराष्ट्रात अलीकडील काळात नव्यानेच हे तेलबियांचे पीक घेतले जाते. सूर्यफुलाचे तेल रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. शिवाय या पिकाची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
* जमीन - हे पीक हलक्या ते भारी जमिनीत येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी.
* पूर्वमशागत - या पिकाची मुळे खोल जाणारी असल्यामुळे २० ते २५ सेमी खोल नांगरट करतात. तसेच कुळवाच्या तीन चार पाळ्या दिल्यानंतर धसकटे, कचरा वेचतात. हेक्टरी १५ ते २५ गाड्या शेणखत घातले जातात.
* पेरणी खरीप - उसावरील एक दोन पाऊस झाल्यावर, जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचा पहिला आठवडा उत्तम. टोकण पद्धत जास्त चांगली. ६०/३० सेमी अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक बी टोकतात.
* आंतरमशागत - पेरणीनंतर १५ दिवसात विरळणी करतात. तीन आठवड्यात पहिली कोळपणी व नंतर १५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी लागते. गरजेनुसार एक दोन खुरपण्या करणे उपयुक्त असते. हे काम पेरणीनंतर दीड महिन्याच्या आत पूर्ण करावे लागते.
* पिकावरील रोग - केसाळ अळी, तुडतुडे, पांढरी माशी, या किडीसाठी ७१५ मिली एन्डोसल्फान तर अल्टरनेरिया या रोगामुळे तांबोरा व ठिपके दिसतात. खरीप हंगामात हा रोग मोठ्या प्रमाणावर येतो.
* उत्पन्न - साधारणपणे प्रतिहेक्टरी १५ ते २० क्विंटल उत्पन्न मिळते.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा