महाराष्ट्राच्या पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या खालोखाल कृष्णा ही नदी आहे. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पुढे बंगालच्या उपसागरात मिळते. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला १२२० मीटर उंचीवर झाला. कृष्णा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस ६५ कि मी अरबी समुद्र आहे. (क्षेत्र महाबळेश्वर) कृष्णा, कोयना, भाग्यश्री, सावित्री, या पाच नद्यांची उगम क्षेत्रे पहावयास मिळतात.
महाराष्ट्रात,कर्नाटक,आंध्रप्रदेश, या तीन राज्यातून कृष्णा नदी वाहत जाते व शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण झाल्यावर मच्छलीपट्ट्नंम जवळ बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कृष्णा नदीची एकूण लांबी १४०० कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र २५८९४८ चौ कि मी आहे. महाराष्ट्रातून कृष्णेचे क्षेत्र २८७०० आहे. कृष्णा नदीला बहुतेक सर्व नद्या उजव्या किनाऱ्याने पश्चिम कडून मिळतात. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, या नद्या उजव्या किनाऱ्याने तर येरळा नदी डाव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळते.
तापी नदीचा उगम मध्यप्रदेश सातपुडा पर्वत रांगावर मुल्ताई येथे होतो. नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास नदी मिळते. तापी नदीची लांबी २०८ कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र ३१६६० चौ कि मी आहे. यापैकी महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ कि मी असून नदीप्रनालीचे क्षेत्र ६५१५० चौ कि मी आहे. महाराष्ट्रात तापी नदीच्या खोऱ्यातून दरवर्षी पाण्याचा प्रवाह सुमारे ७२५० दशलक्ष घनमीटर वाहतो.
तापी नदीच्या उपनद्या - तापी नदी विदर्भाच्या पश्चिम भागातून वाहत येणारी पूर्ण नदी मिळते. हि तापीची मुख्य नदी आहे. तापी नदीला उजव्या बाजूने चंद्रभागा, शहानुर, नंदवान, या उपनद्या मिळतात. बहुतेक सर्व नद्या सातमाळा, अजिंठा डोंगरात उगम पावून दक्षिणोत्तर वाहून डाव्या किनाऱ्याने तापीला मिळतात. या उपनद्या पेढी,काटेपुर्ण, मोर्णा, मन, व नळगंगा. तर तापी पूर्णाच्या संयुक्त प्रवाहास पुढे पश्चिमेकडे वाघुर,गिरणा,बोरी,पांजरा,बुराई,या उपनद्या मिळतात.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा